*कुसडगाव येथे होणार राज्य राखीव दलाचे पोलीस प्रशिक्षण केंद्र*

 

अहमदनगर दि 26 जून टीमसीएम न्यूज

हातनूर वरणगाव तालुका भुसावळ जिल्हा जळगाव येथे होणारे राज्य राखीव पोलीस दलाचे केंद्र आता अहमदनगर जिल्ह्यातील कुसडगाव तालुका जामखेड येथे उभारण्यात येणार असल्याचे शासन निर्णयानुसार जाहीर करण्यात आले आहे. यासंदर्भात गृह विभागाने आदेश जारी केला आहे.
हातनूर वरणगाव तालुका भुसावळ जिल्हा जळगाव येथे राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 19 ची उभारणी करण्यात येणार होती. या संदर्भात 13.9.2019 रोजीच्या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली होती. मात्र अप्पर पोलीस महासंचालक यांच्या पत्रानुसार हे केंद्र जामखेड येथे हलविण्यात आले असल्याचे शासन निर्णयात म्हटले आहे .
कुसडगाव येथील शासकीय जमिनीवर गट क्रमांक 412,413 या वर हे केंद्र उभारण्यात येणार आहे.

 

Share this story