*कोरोना बाधित शिक्षकांचा आकडा वाढतोय;आज इतक्या शिक्षकांची भर*
*कोरोना बाधित शिक्षकांचा आकडा वाढतोय;आज इतक्या शिक्षकांची भर*

 

 

बीड दि 24 प्रतिनिधी
शिक्षक कोरोना बाधित शिक्षकांचा आकडा वाढत असून आज आलेल्या अहवालात 9 शिक्षकांची भर पडली. बीड जिल्ह्यात काल 44 शिक्षक आढळून आले होते.
.

23 नोव्हेंबर रोजी माध्यमिक शाळा सुरू झाल्या जिल्ह्यातील शिक्षकांच्या कोरोना चाचण्या सुरू आहेत.आज 53 संख्या झाली आहे.
9 ते बारावीला शिकवणाऱ्या सर्व माध्यमिक शिक्षकांच्या कोरोना चाचण्या होणे अत्यावश्यक आहे. बीड जिल्ह्यामध्ये गेल्या तीन दिवसापासून त्यांच्या पूर्ण चाचण्या सुरू असून 53 शिक्षक हे कोरोना बाधित असल्याचे आढळून आले आहे.

आतापर्यंत आंबेजोगाई येथील 10 आष्टी येथील 04, बीड येथील 07धारूर येथील 02 गेवराई तालुक्यातील 11,केज 04 ,माजलगाव 01, परळी तालुक्यातील 06 पाटोदा तालुक्यातील 03, शिरूर कासार तालुक्‍यातील 05 एकूण 53 शिक्षकांचा समावेश आहे.तर वडवणी तालुक्यात एकही शिक्षक कोरोना बाधित नसल्याचे आज आलेल्या अहवालामध्ये आले आहे.

आतापर्यंत जिल्ह्यातील 5453 शिक्षकांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यापैकी 1031 त्यांचे अहवाल येणे बाकी आहे.

हेही वाचा:बिबट्याच्या हल्ल्यात पंचायत समिती सदस्य पती ठार

Share this story