बिबट्याने झेप घेतली अन त्याचा खात्मा झाला..11 बळी घेणाऱ्या बिबट्याचा अंत.
बिबट्याने झेप घेतली अन त्याचा खात्मा झाला..11 बळी घेणाऱ्या बिबट्याचा अंत.

.बिबट्याने झेप घेतली अन त्याचा खात्मा झाला…

करमाळा दि 18 डिसेंबर प्रतिनिधी

सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास

बिबट्या च्या शोधात शार्प शूटरची गाडी
रांखुडे वस्तीवर बिबट्याला शोधत होती.अचानक केळीतुन बिबटया पळताना या शूटरला दिसला दोघे चालत्या गाडीतून खाली पळाले..अवघ्या 50 फुटावर तो होता.एकाने एक गोळी बिबट्याच्या दिशेने झाडली. त्या गोळीच्या आवाजाने बिबट्याने थांबून, मागे झेप घेतली अन धाड.. धाड करत दोन गोळ्या बिबट्याच्या कानशिलात गेल्या. बिबटया गतप्राण झाला आणि धाडकन खाली कोसळला…”काम झालं” ही होती  धवलसिंह मोहिते पाटील यांची पहिली प्रतिक्रिया.

बिबट्याने झेप घेतली अन त्याचा खात्मा झाला..11 बळी घेणाऱ्या बिबट्याचा अंत.

धवलसिंह मोहिते पाटील, हर्षवर्धन तावरे आणि चंद्रकांत मंडलिक या तीन शार्प शूटरने पाच जिल्ह्यात 11 बळी घेतलेल्या नरभक्षक बिबट्याला गोळ्या घालून अखेर ठार केले.

करमाळा तालुक्यातील वांगी नं.4 येथे रांखुडे वस्ती वर पांडुरंग रांखुडे यांच्या केळीच्या शेतात त्याला  ठार मारण्यात आले. हा थरार याची देही याची डोळा पाहिलेले सुरज कोरे यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी बिबट्याचा अखेर कसा झाला त्याबद्दल सांगितले.

बिबट्याने झेप घेतली अन त्याचा खात्मा झाला..11 बळी घेणाऱ्या बिबट्याचा अंत.

रांखुडे वस्तीवर सुरज कोरे याचे घर आहे. वन विभागाने नागरिकांना बिबट्या पासून संरक्षण करण्यासाठी घरात राहण्याचे आवाहन केल्यानंतर सुरज हे आपल्या घराच्या गच्चीवरून हा सर्व प्रकार आपल्या डोळ्यात साठवून ठेवत होते.
“आमच्या गच्चीवरून मी पाहत होतो,लागणीची केळी आणि खोडाची केळी या दोन्ही केळाच्या मध्ये रस्ता असल्याने शूटरची गाडी या रस्त्याने जात होती.
बिबटया लागणीच्या केळीतुन खोडाच्या केळीकडे चालला होता,हे त्यांनी पाहिल्यानंतर पटकन उघड्या जीप मधून धडाधड उड्या टाकल्या.पहिली गोळी हर्षवर्धन तावरे यांनी झाडली.गोळी बिबट्याच्या दिशेने गेल्यावर बिबट्याने आपला मोर्चा मागे घेत मागे वळून धवलसिंह यांच्यावर झेप घेतली.पुढचा धोका लक्षात घेऊन क्षणार्धात  धवलसिंह यांनी बंदुकीतून दोन गोळ्या झाडल्या.अन बिबट्या जमिनीवर कोसळला” सुरज कोरे यांनी हा वृत्तांत प्रतिनिधीला सांगितला.

बिबट्याने झेप घेतली अन त्याचा खात्मा झाला..11 बळी घेणाऱ्या बिबट्याचा अंत.

गुरुवारी सायंकाळी वांगी भागातून गेलेला बिबटया परत आला.या भागात आल्याचे गुरुवारी एका जीप चालकाच्या नजरेस पडला त्यानंतर सायंकाळी या भागात तो आल्याचे कळताच वन विभाग आणि शार्प शूटर यांनी नियोजन करून रात्री हा परिसर धुंडाळण्यास सुरूवात केली ,जोडीला या परिसरात नागरिक ही होते.रात्रभर शोधूनही हा बिबट्या सापडला नाही,पुन्हा सकाळी रांखुडे वस्तीच्या दुसऱ्या बाजूला एका ट्रॅक्टर चालकाला नांगरताना दिसला.त्याने तेथून पळ काढला.या बिबट्याचा आज खात्मा करण्याचा चंग बांधला होता.आणि तो तडीस नेला.
गेल्या 14 डिसेंबर ला बिबट्याने सुरू केलेल्या हल्ल्याना एक महिना पूर्ण झाला होता.

बिबट्याने झेप घेतली अन त्याचा खात्मा झाला..11 बळी घेणाऱ्या बिबट्याचा अंत.

हेही वाचा:11 बळी घेणाऱ्या बिबट्याला घातल्या गोळ्या

बिबट्याने केला असा प्रवास

वन विभागाच्या महितीनुसार या बिबट्याने जालना जिल्ह्यात महिला ठार केल्यानंतर पैठण तालुक्यातील अपेगाव येथे पितापुत्राला ठार केले होते .त्यानंतर त्याने हा भाग सोडला तो पाथर्डी तालुक्यातील भगवानगड तांड्यावर एका महिलेवर हल्ला केला .तेथून  शिरूर तालुक्यातील जटवड येथे हल्ला करून आष्टी तालुक्यातील सुरुडी येथे आला .तिथे त्याने नागनाथ गर्जे यांच्या वर हल्ला केल्यानंतर तो कींन्ही येथे आला त्याने स्वराज वर हल्ला केला त्यानंतर नगर जामखेड हायवे ओलांडून त्याने मंगरूळ मध्ये प्रवेश केला.मंगरूळ मध्ये ऐका महिलेवर हल्ला केल्यानंतर तो पारगाव मध्ये गेला तिथे दोन हल्ले केले .त्यामध्ये एक यशस्वी झाला त्यामध्ये सुरेखा बळे यांचा मृत्यू झाला .
त्यानंतर करमाळा तालुक्यातील
कुंदेवाडी येथील कल्याण फुंदे, अंजनडोह येथील सौ जयश्री शिंदे आणि चिकलठाण येथील ऊस तोडणी मजुराची  नऊ वर्षाची मुलगी कुमारी फुलाबाई कोटली यांचा या नरभक्षक बिबट्याने बळी घेतला होता.
सोलापूर ,पुणे, अहमदनगर येथील वनखात्याची टीम याशिवाय 21 पिंजरे 32 कॅमेरे 42 ट्रॅप कॅमेरे पाच शार्प शूटर दोन बेशुद्ध करणारे पथक एक डॉग स्कॉड अशा 16 वेगवेगळ्या टीम द्वारे रात्रंदिवस दीडशे कर्मचारी कोंबिंग ऑपरेशन करत होते. आज झालेल्या कोम्बिंग ऑपरेशन मध्ये वन व महसूल प्रशासनाला तब्बल 17 दिवसाच्या अथक परिश्रमानंतर बिबट्याला ठार मारण्यात यश आले आहे. यामध्ये जिल्हा वन अधिकारी धैर्यशील पाटील करमाळा येथील वनपरिक्षेत्र अधिकारी शीतल नागराळे,शार्प शूटर डॉक्टर चंद्रकांत मंडलिक, हर्ष वर्धन तावरे यांनी विशेष मोलाची कामगिरी बजावली तसेच वन खात्यातील सर्व अधिकारी कर्मचारी तसेच पोलीस यांनी देखील महत्वाची कामगिरी केली.

Share this story