*कोरोनाच्या या काळामध्ये स्वस्त धान्य दुकानदारांकडून गैरव्यवहार शिवसंग्राम खपवून घेणार नाही:सचिन टकले*
*कोरोनाच्या या काळामध्ये स्वस्त धान्य दुकानदारांकडून गैरव्यवहार शिवसंग्राम खपवून घेणार नाही:सचिन टकले*

आष्टी दि, 23 टीम सीएमन्यूज

कोरोनाच्या संकट काळामध्ये स्वस्त धान्य दुकानदारी गोरगरिबांनसाठी आलेलं धान्य नियमाप्रमाणे वाटप करावे कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार खपवून घेतला जाणार नाही.असा इशारा शिवसंग्राम युवक आघाडी चे सचिन टकले यांनी दिला आहे.

बीड जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात धान्य वाटपावर प्रशासनाने नियंञण ठेवावे जेणेकरून कोणत्याही प्रकारचा धान्याचा काळाबाजार होणार नाही. आष्टी तालुक्यात ज्या ज्या गावामध्ये तक्रारी आल्या आहेत त्या दुकानदार यांचे परवाने तत्काल निलंबित करावे. आतां ऊसतोड कामगार ही आपल्या गावी येतं आहेत त्यांचे आलेले धान्य सुद्धा दुकानदार यांनी तत्काल द्यायला पाहिजे व ज्यांचे हातावर पोट आहे अश्या लोकांचे आलेले सर्व रेशन वरील धान्य त्यांना दिले पाहिजे या साठी प्रशासनाने कडक पाऊले उचलावीत या पुढे जर राशन दुकानदार याच्या विषयी कुठलीही तक्रार आली गैरव्यवहार केला तर शिवसंग्राम तुमच्यावर शासनाला कार्यवाही करण्यासाठी भाग पाडूत असे इशारा शिवसंग्राम युवक आघाडी चे सचिन टकले यांनी दिला आहे.

 

Share this story