*बीड जिल्ह्यातील जामखेड नजीकचे गावे बफर झोनमध्ये*
*बीड जिल्ह्यातील जामखेड नजीकचे गावे बफर झोनमध्ये*

*बीड जिल्ह्यातील जामखेड नजीकचे गावे बफर झोनमध्ये*

आष्टी दि,23 टीम सीएमन्यूज

अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड येथे दोन कोरोना बाधित रुग्णांची संख्या आढळून आल्याने आता बीड जिल्ह्यामध्ये ही सतर्कता बाळगली जात आहे. बीड जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी जामखेड पासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या बीड जिल्ह्यातील गावांमध्ये बफर झोन जाहीर केला आहे.
बीड जिल्ह्यातील आष्टा हरिनारायण, शिंदे वस्ती , चिंचपूर, भातोडी, करेवडगाव, मातकुळी ही गावे जामखेड तालुक्याच्या सीमेजवळ आहेत. ही गावे अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आले असून या गावांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. यासंदर्भात बीडचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी अधिसूचना जारी केली आहे.

Share this story