*डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने कडा डॉक्टर्स असोसिएशनचा उपक्रम*
*डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने कडा डॉक्टर्स असोसिएशनचा उपक्रम*

 

कडा दि ,14 एप्रिल टीमसीएम न्यूज

कडा येथील डॉक्टर्स असोसिएशन, ग्रामपंचायत कडा आणि प्राथमिक आरोग्य केंद्र कडा यांच्या संयुक्त विद्यमाने कडा येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने ‘डॉक्टर आपल्या दारी’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

उपक्रमाबद्दल माहिती देताना डॉक्टर प्रमोद भळगट यांनी सांगितले की डॉक्टर असोसिएशनच्या वतीने आम्ही हा उपक्रम घेत आहोत, या उपक्रमांमध्ये आम्ही घरोघरी जाऊन प्रत्येकाची तपासणी करणार आहोत. त्यामध्ये सर्दी ,ताप ,खोकला यासारखे लक्षणे आढळून येणारे पेशंट आहेत. त्यांना वेगळे करून त्यांच्यावर उपचार केले जाणार आहे .

*डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने कडा डॉक्टर्स असोसिएशनचा उपक्रम*

सकाळी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धपुतळ्याला पुष्पहार घालून या उपक्रमाचे सुरुवात करण्यात आली. यावेळी डॉ उमेश गांधी यांनीही उपस्थित नागरिकांना हेल्मेट मास्कचे वाटप केले.
यावेळी गावचे सरपंच अनिल ढोबळे, उपसरपंच योगेश भंडारी, डॉ महेंद्र पटवा ,डॉ खिलारे,ग्रामविकास अधिकारी खिल्लारे,रमेश शिरोळे,मल्हारी जाधव यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

डॉक्टर आपल्या दारी या उपक्रमांमध्ये डॉ. प्रमोद भळगट, डॉअविनाश शिंदे यांच्यासह कर्डीले सिस्टर ,वाघमारे सिस्टर, विधाते सिस्टर यांच्यासह आरोग्य कर्मचारी यांनी
सहभाग घेतला.

Share this story