*बीड जिल्ह्यात मान्सूनची दमदार हजेरी 62 मिलिमीटर पावसाची नोंद*
*बीड जिल्ह्यात मान्सूनची दमदार हजेरी 62 मिलिमीटर पावसाची नोंद*

 

 

बीड दि 12 जून टीम सीएमन्यूज

राज्यात मान्सून दाखल झाल्यानंतर बीड जिल्ह्यातील अनेक भागात पावसाने दमदार हजेरी लावली.जिल्ह्यात 62 मिलिमीटर इतका पाऊस पडला असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे.
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील नांदूरघाट, नेकनूर, यासह पाटोदा तालुक्यातील लिंबागणेश या भागात जोरदार पाऊस झाला.बीड तालुक्यातील अनेक नद्यांना पाणी वाहिले, तर ओढे नाले भरून वाहिले, शेतामध्ये पाणी साचले असून शेतकरी सुखावला आहे .एक तासाहून अधिक वेळ झालेल्या पावसामुळे छोटे नाले भरून वाहू लागल्या आहेत.
अनेक भागात छोट्या ओढ्यांना पूर आला तसेच अनेक शेतकऱ्यांचे शेतामध्ये पाणी घुसल्यामुळे शेत वाहून गेल्याचे घटना घडल्या आहेत. केज तालुक्यातील कोरेगाव येथील ओढ्याला आलेल्या पुरामुळे शेतातून पाणी वाहिले.
पावसामुळे केज मांजरसुम्बा रस्त्यावर नांदूर घाट नजीक चिखलात रुतून ट्रक खाली कोसळला ,या रस्त्याचे काम सुरू असल्यानं कच्चा रस्त्यावरून जावे लागत आहे.

Share this story