*एसपीचे स्टिंग;कोणाला बक्षिसी,कोणाला*शिक्षा;वाचा*
 *एसपीचे स्टिंग;कोणाला बक्षिसी,कोणाला*शिक्षा;वाचा*

बीड दि,१६ मे टीम सीएम न्यूज

स्थळ : दौलावडगाव चेक पोस्ट .वेळ :दुपारचे तीन वाजून दहा मिनिटे झाली होती,,उन डोक्यावर होते,अचानक एक प्रवासी या चेक पोस्ट वरून बीड जिल्ह्याच्या हद्दीत प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होता. त्यासाठी इथे उपस्थित असलेले पोलीसांना  आमिषेही  दाखविण्यात आले मात्र कोणत्याही कागदपत्राशिवाय बीड हद्दीत प्रवेश मिळणार नसल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले. आणि हे  पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले.

उत्तीर्ण झालेल्या पोलिसांना अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी प्रोत्साहनपर बक्षीस जाहीर केले.अंभोरा पोलीस ठाण्याचे दोन कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. मातोरी येथील चेकपोस्ट वरील चकलंबा पोलीस ठाण्यातील कर्मचारी या बक्षिसात पात्र ठरले आहेत.

एकाच ठाण्यातील काही पोलीस बक्षिसाचे मानकरी: काहींचे निलंबन

हर्ष पोद्दार यांच्या या परीक्षेत मात्र दोन चेक पोस्ट वरील कर्मचारी नापास झाले यामध्ये शहागड-खामगांव चेकपोस्ट वरील  गेवराई पोलीस ठाण्याचे कर्मचारी आणि महारटाकळी येथील चेकपोस्ट चकलंबा पोलीस ठाण्याचे कर्मचारी यांचा समावेश आहे. या अनुत्तीर्ण तिघां पोलिसांवर निलंबनाची कारवाई आणि तिघांना  दंड देण्यात आला .विशेष म्हणजे चकलांबा पोलीस ठाण्यातील तिघांना बक्षिसी तर तिघांना दंडाची शिक्षा देण्यात आली.

काय होती परीक्षा

बीड जिल्हा कोरोना विषाणू पासून दूर राहावा यासाठी जिल्हा प्रशासनाबरोबरच पोलीस उत्कृष्ट काम करताना दिसत आहेत. जिल्ह्यातील सीमाभागात २३ चेक पोस्ट तयार करण्यात आले आहेत. त्या चेकपोस्टवर पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यासह आरोग्य कर्मचारी तसेच शिक्षक यांची नेमणूक करण्यात आली आहे. बाहेरील जिल्ह्यातून बीड जिल्ह्यात येणारे प्रवासी नागरिकांचे पास व कागदपत्रे यांची पाहणी करून त्यांना जिल्ह्यात प्रवेश देण्यात येत आहे परंतू काही चेकपोस्टवरील अधिकारी व कर्मचारी आपले कर्तव्य करतांना काळजीपुर्वक नागरिकांची विचारपूस व कागदपत्राची पाहणी न करता आपल्या अधिकारात बीड जिल्ह्यात प्रवेश देत असल्याचे माहीती पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांना मिळाली. प्रत्येक चेकपोस्टवरील अधिकारी व कर्मचारी हे नागरिकांची कागदपत्र आणि पास ची पाहणी,पडताळणी करून जिल्ह्यात प्रवेश देतात का ? याबाबत शहानिशा करण्यासाठी मा.पोलीस अधीक्षक श्री हर्ष ए पोद्दार यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक श्री. विजय कबाडे यांनी जिल्ह्यात दि.15 मे  रोजी दिवसा व रात्री चेकपोस्टवर खाजगी डमी प्रवासी वाहनासह बाहेर जिल्ह्यातून बीड जिल्ह्यात प्रवेश करण्यासाठी पाठवून खात्री केली.

जिल्ह्यातील दौलावडगाव,मातोरी,महारटाकळी आणि शहागड येथील चेकपोस्टचा समावेश आहे.या चेक पोस्टवर डमी व्यक्ती पाठवून जिल्ह्यात प्रवेश देण्यासाठी सांगण्यात आले मात्र यामध्ये दोन चेक पोस्ट वरील पोलीस पास झाले आणि दोन चेक पोस्ट वरील पोलीस नापास झाले.

दौलावडगांव येथील चेकपोस्ट अंभोरा पोलीस ठाणे अंतर्गत ठिकाणी डमी प्रवासी यांनी अहमदनगर जिल्ह्यातून बीड जिल्ह्यात प्रवेश करते वेळी दौलावडगाव चेकपोस्टवरील कर्मचारी यांनी कोणत्याही अमिषाला बळी न पडता त्या इसमास जिल्ह्यात प्रवेश दिला नाही या उत्कृष्ट कामगिरी बद्दल पोह.एस.ए येवले, पोह. व्ही.एस.माळी यांना प्रोत्साहनपर प्रत्येकी 5000/- रू व जीएसटी बक्षीस मंजूर करण्यात आले आहे.

मातोरी येथील चेकपोस्ट चकलंबा पोलीस ठाणे अंतर्गत ठिकाणी डमी प्रवासी यांनी अहमदनगर जिल्ह्यातून बीड जिल्ह्यात प्रवेश करते वेळी मातोरी चेकपोस्टवरील कर्मचारी यांनी कोणत्याही अमिषाला बळी न पडता त्या इसमास जिल्ह्यात प्रवेश दिला नाही या उत्कृष्ट कामगिरी बद्दल पोह.डी. एम.राऊत,. पोना. डी. एम.डोंगरे,पोशि. टी.यू.पवळ यांना प्रोत्साहनपर प्रत्येकी 5000/- रू व जीएसटी बक्षीस मंजूर करण्यात आले.

कोणाला शिक्षा

शहागड-खामगांव चेकपोस्ट गेवराई पोलीस ठाणे अंतर्गत ठिकाणी डमी प्रवासी यांनी चेकपोस्टवर जिल्ह्यात येण्यासाठी विनंती केल्यावर तेथील कर्मचारी पोना.एस.बी.उगले यांनी डमी प्रवासी यांच्याकडे पैश्याची मागणी केली त्यामुळे पोलीस कर्मचारी यांनी विनापास प्रवासी प्रवेश करण्यास मदत करतांना आढळून आले म्हणून नमुद चेकपोस्टवर पोह. एम के बहीरवाळ,पोना. डी.बी.गुरसाळे पोना. एस. बी. उगले यांना त्वरीत प्रभावाने शासकीय सेवेतून निलंबीत करण्यात येत आहे.

महारटाकळी येथील चेकपोस्ट चकलंबा पोलीस ठाणे अंतर्गत ठिकाणी डमी प्रवासी यांनी चेकपोस्ट ओलांडुन शेवगाव कडे जात असतांना चेकपोस्ट वरील कर्मचारी यांनी इसमास थांबविले नाही परत 15 मिनिटांनी बीड जिल्ह्यात येतांना कसल्याही प्रकारची चौकशी केली नाही म्हणून पोना. बी.बी.लोहबंदे , पोना. एस. के लखेवाड ,पोना. एस. एस. वाघमारे यांना सदर कसूरी बाबत 3000/- रू. दंडाची शिक्षा देण्यात आली आहे. सदरची कार्यवाही मा.पोलीस अधीक्षक श्री हर्ष ए पोद्दार यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक श्री. विजय कबाडे आणि पोलीस अधिकारी व कर्मचारी टिमने केले आहे.

Share this story