बीड जिल्हयातील बंद कारखाने सुरू होणार;कॉ अजय बुरांडे
बीड

परळी

     बीड जिल्हयातील वैद्यनाथ व अंबाजोगाई साखर कारखाने सुरू करण्यास परवानगी दिल्याचे साखर आयुक्तांनी किसान सभेच्या शिष्टमंडळास दिल्याची माहीती कॉ.एड.अजय बुरांडे यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उस गाळपाचा प्रश्न सुटणार आहे.

      बीड जिल्ह्यातील अतिरीक्त उसाच्या प्रश्नावर गुरूवारी (ता.२३) अखिल भारतीय किसान सभेच्या शिष्टमंडळानी पुणे येथील साखर आयुक्त शेखर गायकवाड यांची भेट घेतली. शिष्टमंडळात किसान सभेचे कॉ.एड.अजय बुरांडे, कॉ. दत्ता डाके, कॉ. जगदिश फरताडे व जनवादी महिला संघटनेच्या किरण मोघे यांचा समावेश होता. यावेळी साखर आयुक्तांना बीड जिल्हयात असलेल्या उसापैकी दहा लाख मेट्रीक टन गाळपा अभावी शेतात उभा राहु शकतो. त्यामुळे किसान सभेनी मागील तीन महिन्या पासुन याबाबत पाठपुरावा सुरू ठेवलेला आहे. राज्यतील साखर कारखाने सुरू होउन दोन महिन्याचा कालावधी झालेला असतानाही बीड जिल्हयातील परळी तालुक्यातील वैद्यनाथ साखर कारखाना, अंबाजोगाई तालुक्यातील अंबाजोगाई साखर कारखाना व केज तालुक्यातील विखे पाटील साखर कारखाने बंद आहेत. त्यांच्याच कार्यक्षेत्रातील उस शिल्लक राहण्याची भिती असल्याचे किसान सभेच्या शिष्टमंडळानी सांगीतले. यावर साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी परळी तालुक्यातील वैद्यनाथ साखर कारखाना गाळपाची परवानगी दिली असल्याचे सांगीतले. शिवाय पानगाव येथील पन्नगेश्वर कारखान्यास परवानगी दिली आहे. अंबाजोगाई सहकारी साखर कारखाना एका आठवडयात सुरू करावा अन्यथा पंधरा दिवसात निविदा काढुन चालविण्यासाठी देण्यात येणार आहे. याबाबत कारखान्याला कळविण्यात आले आहे. निविदा काढुन लवकरच अंबाजोगाई कारखाना सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे बीड जिल्हयातील शेतकऱ्यांचा संपुर्ण उसाचे गाळपाचे नियोजन करण्यात आलेले आहे. बीड जिल्हयातील सर्व उसाचे गाळप होई पर्यंत साखर कारखाने बंद करता येणार नाहीत. मे च्या अखेरीस पर्यंत कारखाने चालउन उसाचे गाळप करण्यात येईल असे आश्वासन किसान सभेच्या शिष्टमंडळास साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिल्याचे कॉ.एड.अजय बुरांडे यांनी सांगीतले आहे.

Share this story