*बीड जिल्ह्यात 9 कोरोना पॉझिटिव्ह;आष्टीत आणखी एक*
*बीड जिल्ह्यात 9 कोरोना पॉझिटिव्ह;आष्टीत आणखी एक*

 

बीड दि 13 जुलै टीम सीएमन्यूज

जिल्हा आरोग्य विभागाला प्राप्त झालेल्या अहवालामध्ये 9 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळुन आले आहेत.गेल्या दोन दिवसात 628 स्वब चे अहवाल प्रलंबित होते.त्यापैकी 195 अहवाल आता हाती आले आहेत.

हेही वाचा:परळी स्टेट बँकेचे 4 ग्राहक पॉझिटिव्ह

बीड जिल्ह्यातील दुपारी 5 कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर उशिरा आलेल्या अहवालात 9 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत .सर्वच अहवाल प्रशासनाला प्राप्त झाले नसून कालचे आणि आजचे मिळून 433 अहवाल प्रलंबित आहेत.
दुपारी आलेल्या पाच अहवालात परळी येथील चार आढळून आले आहेत .नव्याने प्राप्त झालेल्या अहवालात आष्टी शहरातील दत्तमंदिर गल्ली तील कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीच्या सहवासातील एक व्यक्ती,शिरूर तालुक्यातील तागडगाव येथील कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कातील व्यक्ती यांचा समावेश असून उर्वरित 7 हे बीड शहर आणि तालुक्यातील आहेत.त्यामध्ये ३५ वर्षीय पुरुष रा.चौसाळा, पॉझिटिव्ह रुग्णाच्या सहवासातील,
१६ वर्षीय पुरुष रा.चौसाळा, पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासातील, ३७ वर्षीय महिला रा.चौसाळा, पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासातील, ४० वर्षीय पुरुष रा.रानुमाता मंदीराच्या मागे जाहुनगर,बीड
५२ वर्षीय महिला रा.तुळजाईनगर,बीड पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासातील, ३७ वर्षीय महिला रा.संत तुकारामनगर,बीड पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासातील, ४६ वर्षीय पुरुप (अक्षय प्लाज्ञा, व्यंकटेश ज्ञाळेच्या जवळ, भक्ती कन्स्ट्रक्शन ,पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासातील आहेत.
अहवाल प्राप्त:- १९५
पॉझिटिव्ह:- ९
अनिर्णीत:- ०२
निगेटिव्ह:- १८४
कालचे आणि आजचे प्रलंबित:- ४३३

Share this story