*भाजपचे जेष्ठ नेते जयसिंगराव गायकवाड यांचा भाजप प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा*
*भाजपचे जेष्ठ नेते जयसिंगराव गायकवाड यांचा भाजप प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा*

 

 

औरंगाबाद दि 17 ,प्रतिनिधी

भाजप चे नेते जयसिंगराव गायकवाड यांनी पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत उमेदवारी मागूनही पक्षाने दखल न घेतल्यामुळे भाजपा प्राथमिक व प्रदेश कार्यकारणी सदस्यत्वाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडे पाठवला आहे.
बंडखोरी करून मराठवाडा पदवीधर मतदार संघात भरलेला अर्ज आपण मागे घेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. जयसिंगराव गायकवाड हे बीड जिल्ह्यातून खासदार व दोनदा पदवीधर मतदारसंघातून आमदार राहिले आहेत.

भाजप चे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना पाठवलेल्या पत्रात जयसिंगराव गायकवाड यांनी म्हटले आहे की मी,जयसिंगराव गायकवाड पाटील भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यसमिति सदस्यत्वाचा व प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे कृपया सुकृत करावा ही विनंती.

हेही वाचा:आज १६९ रुग्णांना डिस्चार्ज तर १८१ बाधितांची रुग्णसंख्येत भर

जयसिंगराव गायकवाड पाटील हे यापूर्वी केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री, सहकार राज्यमंत्री महाराष्ट्र सरकार, माजी मराठवाडा पदवीधर आमदार (दोन वेळा) आणि माजी खासदार (तीन वेळा) राहिलेले आहेत.
त्यांच्या उमेदवारी अर्ज मागे घेण्यात मुळे भाजपाच्या उमेदवार शिरीष बोराळकर मार्ग जरी सुकर झाला असला तरी बीडचे रमेश पोकळे हेही या पदवीधर मतदारसंघांमध्ये बंडखोर करण्याच्या तयारीत आहेत.त्यांची सध्या भारतीय जनता पक्षाच्या वतीने समजूत काढण्याचा प्रयत्न केला जात आहे.

Share this story