*वामनभाऊ महाराजांच्या पादुका हेलिकॉप्टरने पंढरपूरला नेण्यासाठीची याचिका फेटाळली*
*वामनभाऊ महाराजांच्या पादुका हेलिकॉप्टरने पंढरपूरला नेण्यासाठीची याचिका फेटाळली*

 

महेश डागा
औरंगाबाद दि.30 जुलै.

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरात होणाऱ्या सोहळ्यासाठी बीड जिल्ह्यातील चिंचोली येथील गहिनीनाथ गडावरील पादूका हॅलिकॉप्टरने पंढरपूर येथे नेण्याची परवानगी महाराष्ट्र शासनाने नाकारली. या निर्णयाविरोधात गहिनीनाथ मंदिरामार्फत विठ्ठल महाराज यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती मात्र औरंगाबाद खंडपीठात न्या. एस पी देशमुख व न्या. बी यु डेबलवार यांच्या संयुक्त बेंचने ही याचिका फेटाळली.

सध्या कोरोना महामारीचा काळ असुन देव हा भक्तांसाठीच असतो त्यामुळे लोकांचे जीव महत्वाचे असुन या दृष्टिकोनातून या वर्षी शतकोनुशतकेच्या परंपरा असणाऱ्या मानाच्या चार पालख्यांना फक्त २० वारकऱ्यांसोबत पंढरपूर येथे जाण्याची परवानगी शासनाने व्यापक लोकहित लक्षात घेता दिली असे निरिक्षण न्यायालयाने नोंदविले. यावेळी शासनाची बाजू सरकारी वकील डी आर काळे यांनी मांडली.

 

Share this story