*भारत-चीन सीमेवर गलवान घाटी,लडाख मध्ये 20 जवान शहीद*
*भारत-चीन सीमेवर गलवान घाटी,लडाख मध्ये 20 जवान शहीद*

 

नवी दिल्ली दि 16 जून ,टीमसीएम न्यूज

भारत आणि चीन या दोन देशांमधील संबंध तणावाचे होताना दिसत आहेत. यातच आज भारताचे 20 जवान गलवानघाटी ,लढाख येथे LAC वर शहीद झाल्याचे वृत्त NDTV या वृत्त वहिनीने दिले आहे. भारताच्या आणि चीनच्या सैन्यामध्ये झालेल्या धुमश्चक्रीत हे जवान शहीद झाल्याचे वृत्त आहे.त्यामुळे पुन्हा एकदा भारत आणि चीन या दोन देशांमधला तणाव वाढला आहे.
दिनांक 15 आणि 16 जून या रोजी भारत आणि चीनच्या (लाइन ऑफ अॅक्च्युअल कंट्रोल) सीमेवर तैनात असलेल्या या दोन देशांच्या सैन्यामध्ये लाठीकाठीची धुमश्चक्री होऊन यामध्ये 20 जवान शहीद झाले आहेत.
संरक्षण मंत्रालयाच्या हवाल्याने मिळालेल्या बातमीनुसार सकाळी तीन जवान शहीद झाल्याचे वृत्त आले होते. त्यानंतर आता उशिरा रात्री मिळालेल्या माहितीनुसार आणखी 17 जवान यामध्ये शहीद झाल्याचे वृत्त आहे.
भारत आणि चीन या दोन देशातील सैनिकांमध्ये झालेली ही ची धुमश्चक्री आहे ही गोळीबारातून न होता लाठ्याकाठ्या च्या मारामारीत ऊन 20 जवान शहीद झाले आहेत.

Source:ndtv.

Share this story