*राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार गोपाळवाडी-चेडगावचे जिल्हा परिषदेचे शिक्षक नारायण चंद्रकांत मंगलाराम यांना प्रदान*
*राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार गोपाळवाडी-चेडगावचे जिल्हा परिषदेचे शिक्षक नारायण चंद्रकांत मंगलाराम यांना प्रदान*

 

 

अहमदनगर दि 5 प्रतिनिधी

केंद्रीय शिक्षण मंत्रालयातर्फे देण्यात येणारा राष्ट्रीय पुरस्कार आज अहमदनगर जिल्ह्यातील गोपाळवाडी-चेडगाव तालुका राहुरी येथील जिल्हा परिषदेचे शिक्षक नारायण चंद्रकांत मंगलाराम यांना प्रदान करण्यात आला.आभासी पद्धतीने राष्ट्रपती भवन येथून झालेल्या कार्यक्रमात त्यांना हा पुरस्कार अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

सकाळी 11 वाजता राष्ट्रपती भवन येथून या कार्यक्रमाचा प्रारंभ झाला.यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासह केंद्रीय शिक्षण मंत्री रमेशचंद्र पोखरियाल निशंक ,केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री संजय धोत्रे,उपस्थित होते.
राष्ट्रपती यांच्या उपस्थितीत सर्व पुरस्कार प्राप्त शिक्षकांची ओळख आणि त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.त्यांनतर जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या हस्ते केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने पाठविलेल्या सन्मानपत्र आणि मेडल मंगलाराम यांना प्रदान करण्यात आले.यावेळी त्यांचे कुटुंबीय,शिक्षण विभागातील अधिकारी उपस्थित होते.त्यानंतर आपल्या कामाचे कौतुक या पुरस्काराने केले असल्याची भावना नारायण मंगलाराम यांनी व्यक्त केली .

हेही वाचा:कोरोनाने जिल्हा व्यापला;गावागावात कोरोना,176 रुग्ण

 

गोपाळवाडी या शाळेत बहुतांश मुले हे भटक्या जमातीचे आहेत .त्यांना शिक्षणात गोडी निर्माण करून वेगवेगळे उपक्रम मंगलाराम यांनी राबविले आहेत.नवी दिल्लीच्या ncert च्या पथकाने या शाळेवर येऊन यापूर्वी मंगलाराम यांच्या उपक्रमाची दखल घेतली .आर्ट इंटेग्रॅटेड लर्निंग या उपक्रमांतर्गत कलेच्या माध्यमातून शिक्षण देण्याचा त्यांनी प्रयत्न केला.नाटयीकरण ,बाहुली नाट्य यासारखे प्रयोग केले .मायक्रोसॉफ्ट इनोव्हेटिव्ह टीचर्स च्या माध्यमातून जगातील 25 देशातील शिक्षकांशी संपर्कातून जगाची व्हर्चुअल सहल विद्यार्थ्यांना घडविण्यात आली.याच बरोबर कल्चर बॉक्सची देवाण घेवाण करण्यात आली .या अध्यापनातून विद्याथी ग्लोबल बनण्यास मदत झाल्याचे मंगलाराम यांनी सांगितले.

Share this story