*कुठे आहे अहमदनगर जिल्ह्यातील गांधीजींचे गाव*
*कुठे आहे अहमदनगर जिल्ह्यातील गांधीजींचे गाव*

अहमदनगर दि 2 ऑक्टोबर,प्रतिनिधी

दोन ऑक्टोबर संपूर्ण देश गांधीजींची १५१ वी जयंती साजरी करत आहे. ज्या गांधीजींनी मूलोद्योगी शिक्षणाचा मंत्र दिला आणि जगण्याची तालीम दिली.त्या गांधीजींचा संपूर्ण पूर्णाकृती पुतळा अहमदनगर जिल्ह्यातील कोंभळी गावात उभारण्यात आलेला आहे.त्या गावात गांधीजींच्या मूल्यांची रुजवणूक होत आहे.

कोंभळी गावात गेल्यावर असे वाटणार नाही की इथं गांधीजींच्या विचारांची जपवणूक होतय. गावातील जिल्हा परिषद शाळेत गेल्यावर या गावातील गांधीजींच्या विचारधारा गावात कशी रुजली जाते याचे दर्शन घडते.शाळेच्या आवारात सर्वोदय मंदिर पहायला मिळते .याच सर्वोदय मंदिरात गांधीजींनी दिलेल्या मूलमंत्राचा आधार घेऊन सहभागी झालेल्या ग्रामस्थांच्या कर्तृत्वाचा आलेख पहावयास मिळतो.

*कुठे आहे अहमदनगर जिल्ह्यातील गांधीजींचे गाव*

सर्वोदय मंदिरात गांधीजींचा पूर्णाकृती पुतळा उभा आहे. हा पुतळा संपूर्ण संगमरवरी आहे .सन 1955 मध्ये या मंदिरात हा पुतळा बसविण्यात आला आहे.
याबाबत माहिती देताना गावचे सरपंच कुंडलिक गांगर्डे यांनी सांगितले की ,दरवर्षी
गावात गांधी जयंतीच्या माध्यमातून ग्राम स्वच्छता ,वृक्षारोपण यासारखे उपक्रम हाती घेतले जातात. पण आता मंदिर बंद आहे.
गावातील मुलांना लहानपणापासून गांधीजींच्या विचारांची ओळख होते. मंदिरात शाळा भरत असल्याने मुलांना दररोज गांधीजींचे दर्शन मिळते.
गावातील नागरिकांसाठी गांधीजींचे मंदिर हे राजघाट आहे. जिल्ह्यात गांधीजींचे मंदिर असलेलं हे एकमेव मंदिर आहे.
गावातील  युवकांसाठी हे मंदिर  प्रेरणास्थान  बनले आहे.कर्जत तालुक्यातील या गावात सन १९५५ साली गांधीजींचा पूर्णाकृती संगमरवरचा पुतळा बसविण्यात आला. त्यासाठी मंदिर उभारण्यात आले आहे .

का मंदिर?

स्वातंत्र्य प्राप्तीपूर्वी या गावात मूलोद्योगी  शाळा सुरु करण्यात आली होती.या शाळेतील मुले सुत कातण्याचे काम करत आणि ते सुत वर्धा येथे पाठवून दिले जाई . जी शाळा जास्त सुत पाठवून देईल त्या शाळेला गांधीजी बक्षीस देत असत . अशा प्रकारे या शाळेने अनेक बक्षिसे मिळविली आहेत ते सर्व प्रमाणपत्रे या शाळेत सुरक्षित आहेत . त्यामुळे या गावातील नागरिकांना गांधीजींच्या विचारांची ओळख झाली .आता शाळा बंद असल्याने हे मंदिर बंद आहे. गावातील लोक सुत कातण्याचे काम करत असत.आजही गावातील कार्यक्रमाची सुरुवात या गांधीजीची पूजा करून होते तर लग्न सारखे समारंभ झाल्यानतर नव वधू-वर आपल्या संसाराची सुरुवात या गांधीजींचे दर्शन करून करतात.या गावाने आजही गांधीजींच्या विचारांचा वारसा जपला आहे.

Share this story