*कोरोना संकटात पनवेल परिसरातील गरजवंत नागरिकांना अजय कापरे यांच्या कडून मदत .*
*कोरोना संकटात पनवेल परिसरातील गरजवंत नागरिकांना अजय कापरे यांच्या कडून मदत .*

 

 

पनवेल दि १, टीम सीएमन्यूज

जगात कोरोना महामारिने थैमान घातले आहे .भारतात ,महाराष्ट्रात याचे खूपच गंभीर परिणाम समोर येत आहेत . लॉक डाऊन मुळे तर अनेक नागरिकांना वर उपासमारी ची वेळ आली आहे . शासन सर्व परीने नागरिकांपर्यंत मदत पोहोचवण्याचे काम करत आहे .काही सामाजिक संस्था सुद्धा यात पुढे येत आहेत . अशाच प्रकारे आष्टी तालुक्यातील भूमिपुत्र व सध्या पनवेल येथे वास्तव्यास असणारे अजय कापरे हे ही पनवेल परिसरात अनेक गरजवंताला वेगवेगळ्या परीने मदत करत आहेत .

पनवेल परिसरात बीड व नगर जिल्ह्यातील अनेक लोक इकडच्या सतत पडणाऱ्या दुष्काळाला कंटाळून पोट भरण्यासाठी गेले आहेत यातील अनेक जण हमाली, रिक्षा चालक, कंपनीत कामगार म्हणून काम करत आहेत. पण सध्या लॉक डाऊन मुळे यांचे काम बंद असल्याने यांच्या पोटापाण्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे. सरकार स्वस्थ धान्य दुकान वरून, स्वस्त धान्य देत आहे पण बऱ्याच लोकांकडे रेशन कार्ड नाही. आणि काही पर राज्यातील लोक जे पाल ठोकून पनवेल परिसरात राहतात त्यांच्याकडे तर स्वतःचे ओळखपत्रही नाही अशा लोकांपर्यंत सरकारी मदत पोहोचायला खूप अडचण होते हीच बाब ओळखून अजय कापरे आणि त्यांचे सहकारी पांडुरंग काळे यांनी कामोठे येथील त्यांच्या हॉटेल कडक स्पेशल (शीवभोजन केंद्र) मार्फत रोज 500 गरजवंतांना, यात महिला पुरुष आणि लहान मुले यांना दुपारचे पोस्टिक भोजन पुरवत आहेत . गरजवंतांना अन्नधान्य व किराणा आणि वृद्ध व्यक्ती व मुलांसाठी मेडिकल खर्चासाठी आर्थिक मदतही करत आहेत. त्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधी व पी एम केअर निधी मध्येही तीस हजार रुपये देणगी दिली आहे. स्वर्गीय राहुल रमेश पाटील यांचा सामाजिक कार्याचा वारसा पुढे चालवावा यासाठीच आपण समाजकार्य करत आहोत असे अजय कापरे यांनी सांगितले.या आधी 2015 मध्ये आष्टी तालुक्यात भीषण दुष्काळ पडला होता त्यावेळी अजय कापरे यांनी पुढाकार घेऊन स्व:राहुल पाटील यांचे आर आर फाउंडेशन, सत्याज्योत प्रतिष्ठान परशुराम बनसोडे,व देवाज ग्रुप आणि आष्टी तालुका युवा पत्रकार संघ यांच्यामार्फत दुष्काळग्रस्तांसाठी , खते व बी बियाणे ,मजुरांसाठी एक महिन्याचा किराणा आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील व्यक्तींना आर्थिक मदतही केली होती. सध्याही हे कार्य अविरतपणे सुरू आहे. जर आपल्या ओळखीतील पनवेल परिसरात कोणी राहत असतील आणि त्यांना किराणा किंवा इतर काही गरज असेल तर आपल्याला 997091622 या नंबर वर संपर्क करा असे अजय कापरे यांनी सांगितले आहे.

Share this story