*सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात येणार;प्रकृती स्थिर-आरोग्यमंत्री राजेश टोपे*
*सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात येणार;प्रकृती स्थिर-आरोग्यमंत्री राजेश टोपे*

 

मुंबई दि,12 जून टीम सीएम न्यूज

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे कोरोना लागण झाली असली तरी त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात येणार असून त्यांना कोणतीही लक्षणे नाहीत. श्वास घेताना थोडा त्रास जाणवत आहे. पण सर्व नियंत्रणात असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं.

धनंजय मुंडे हे राष्ट्रवादीच्या वर्धापन दिन कार्यक्रमात आणि राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सहभागी झाले होते. मात्र, या दोन्ही ठिकाणी पूर्ण काळजी घेण्यात आली होती. त्यामुळे संसर्गाची भीती नाही. पूर्वी चिकटून खुर्च्या असायच्या, आता एक आड एक खुर्च्या असतात. कोरोनासोबत जगताना आवश्यक ती सर्व खबरदारी घेतली जाते. बैठकीत सर्वांनी मास्क लावले होते. त्यामुळे काळजीचे काही कारण नाही, हे हाय रिस्क काँटॅक्ट नाहीत. स्वीय सहाय्यक, वाहन चालक असे जे २४ तास सतत सोबत असतात, ते हाय रिस्क काँंटॅक्ट ठरतात. पण कोणा मंत्री किंवा अधिकाऱ्यांना शंका वाटली, तर त्यांनी आपली चाचणी करुन घ्यावी, असं सांगतानाच लक्षण दिसली तर मंत्री क्वारंटाईन होतील, असंही टोपे यांनी सांगितलं.

Share this story