१ ली ते इ.१२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी डी. डी. सह्याद्री वाहिनीच्या माध्यमातून १४ जून २०२१ पासून शैक्षणिक तासिकांचे प्रक्षेपण
१ ली ते इ.१२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी डी. डी. सह्याद्री वाहिनीच्या माध्यमातून १४ जून २०२१ पासून शैक्षणिक तासिकांचे प्रक्षेपण

शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती


शालेय शिक्षण विभागाच्या वतीने ‘ज्ञानगंगा’ ह्या शैक्षणिक कार्यक्रमांतर्गत राज्यातील इ.१ ली ते इ.१२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी डी. डी. सह्याद्री वाहिनीच्या माध्यमातून १४ जून २०२१ पासून शैक्षणिक तासिकांचे प्रक्षेपण केले जाणार आहे.कोरोनामुळे शाळा बंद असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

सोमवार ते शुक्रवार सकाळी ७.३० ते दुपारी ३.३० वा. या कालावधीत वाहिनीवरील काही नियोजित बातम्यांची वेळ वगळता दर दिवशी ५ तास इयत्तानिहाय तासिकांचे प्रक्षेपण केले जाणार आहे.

सदर कार्यक्रमाचे वेळापत्रक www.maa.ac.in या संकेतस्थळावर पाहता येईल. शैक्षणिक कार्यक्रमाचे दैनिक वेळापत्रक पाहण्यासाठी परिपत्रकात दिलेला QR कोड स्कॅन करा अथवा त्याठिकाणी क्लिक करून संकेतस्थळावरील वेळापत्रक पाहता येईल.

DD Free Dish – 525, Dish TV – 1229, Videocon D2H – 769, Tata Sky – 1274, Hathway – 513 ह्या क्रमांकावर डी. डी. सह्याद्री वाहिनी प्रक्षेपित होत असून विद्यार्थ्यांना याठिकाणी शैक्षणिक कार्यक्रमाचे प्रक्षेपण पाहता येईल.

प्रथम टप्प्यात इ. १० वी मराठी माध्यम व इंग्रजी माध्यम तसेच इ. १२ वीच्या तीनही शाखांच्या शैक्षणिक तासिकांचे प्रक्षेपण सुरू करण्यात येत आहे. उर्वरित इयत्तांच्या तासिकांचे प्रक्षेपण देखील लवकरच सुरू करण्यात येणार आहे.

Share this story