‘त्या’ नरभक्षक बिबट्या शोधण्यासाठी काय सुरू आहे? गाव शेतावर
‘त्या’ नरभक्षक बिबट्या शोधण्यासाठी काय सुरू आहे? गाव शेतावर

 

त्या नरभक्षक बिबट्या शोधण्यासाठी काय सुरू आहे? गाव शेतावर

करमाळा दि 11प्रतिनिधी

चार जिल्ह्यात 11 बळी घेणाऱ्या नरभक्षक बिबट्याला शोधण्यासाठी उजनी नदीच्या काठावरच्या शेतात शोध मोहीम सुरू आहे.बिटरगाव मधील दोन एकर ऊसाला वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी वेढा दिला.त्यांना मदतीला शार्प शूटर काम करत आहेत.

औरंगाबाद, अहमदनगर, बीड आणि सोलापूर जिल्ह्यात 11 बळी घेणाऱ्या बिबटया प्रवास करत नरबळी घेत तो उजनीच्या काठावर पोहचला आहे.
करमाळा तालुक्यात तीन जणांचे बळी घेतलेल्या नरभक्षक बिबट्या आता वन विभाग आणि शार्प शूटरच्या टप्प्यात आला.
बिटरगाव मध्ये केळीच्या बागेत लपलेल्या बिबटयावर तीन फायर करण्यात आले .मात्र त्याने गोळ्या हुकवून तो उसाच्या शेतात पसार झाला.

हेही वाचा:*विहिरींचे उद्दिष्ट पूर्ण न करणाऱ्या सरपंच आणि ग्रामसेवकांचा होणार सत्कार – आ.सुरेश धस*

केळीच्या शेतातून बिबटया उसाच्या शेतात घुसल्याने त्याला घेरण्याचा प्रयत्न होत आहे.शेताच्या सर्व बाजूने बिबट्याला जाळ्यात पकडण्यासाठी जाळ्या लावण्यात आल्या आहेत.एका बाजूने जेसीबी मशीन या दोन एकर क्षेत्रात घुसविण्यात आला असून तो जसा पुढे जाईल तसा बिबट्या उसातून बाहेर येण्याचा प्रयत्न करील आणि जाळ्यात अडकेल अशी व्यवस्था करण्यात आली आहे.
बिबट्याला शोधण्यासाठी जवळच्या गावातून वैदू समाजाची मदत घेण्यात आली आहे.त्याचें शिकारी कुत्रे ही या ठिकाणी आणण्यात आले असून वेळ प्रसंगी तेही या शेतात सोडण्याचा विचार सुरू आहे.एकूणच बिबट्याला जेरबंद अथवा बेशुद्ध किंवा ठार मारण्यासाठी वन विभाग प्रयत्नशील असल्याचे चित्र सध्या येथे आहे.
बिटरगाव परिसरातील नागरिक या बिबट्याने भयभीत झाले असून या मोहिमेला मदत करण्यासाठी गावकरी या शेताच्या बाजूला जमा झाले असून बिबट्याच्या पकडण्याच्या मोहिमत सहभागी होत आहेत.

हेही वाचा:त्या नरभक्षक बिबट्याने तीन गोळ्या हुकविल्या?

Share this story