ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

*वाघ देवतेच्या प्रतिस्थापणेने वाघ बारस साजरी*

शेअर करा

 

राजूर, दि 12 प्रतिनिधी

वाघबरस, वाघ देवतेच्या पूजनाने आदिवासींनी आपल्या दिवाळी सणाला प्रारंभ केला . आदिवासी पारंपरिक नृत्य , वाघ देवतेचे पूजन , मिरवणूक , पारंपरिक वाद्य वाजवत दहा गावातील ग्रामस्थांनी आपल्या देवतेला नतमस्तक होऊन पूजन करून वाघबारस साजरी केली .

तालुक्यातील पाचनई , पेठ्याची वाडी , कुमशेत , जानेवाडी , आंबित , लव्हली ओतूर , लव्हाळी कोतुळ ,शिरपुंजे ,धामणवण ,हेंगाडवाडी या गावच्या सरहद्दीवर असलेल्या वाघ देवतेच्या नावाने दरवर्षी येथे मोठी यात्रा भरते. कोरोना मुळे यात्रा न भरवता वाघ देवतेच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करण्यात आली .पूजन झाल्यावर यात्रा भरते मात्र पाचनई येथे कोरोनामुळे यात्रा न भरता वाघ देवतेच्या मूर्तीचा जीर्णोद्धार करण्यात आला. सांस्कृतिक कार्यक्रम , आदिवासी कोंबड नाच यांनी परिसर दुमदुमून गेला होता सर्व गावचे सरपंच पोलीस पाटील , लोक प्रतिनिधी , महिला तरुण मोठ्या संख्येने हजर होते .

यावेळी आमदार किरण लहामटे,माजी आमदार वैभव पिचड, पाचनई सरपंच पार्वताबाई घोगरे , उपसरपंच सुंदराबाई खोडके , विष्णू भारमल कुमशेटचे सरपंच सयाजी अस्वले पोलीस पाटील साहेबराव भारमल , मनोहर पाठवा सरपंच आंबित , मीराबाई दिघे सरपंच लव्हाळी , नागेश बोटे , बारकू भारमल , नवनाथ लांघी , संतोष भारमल शरद टिपे , यशवंत पारधी किसान बाबद , कुंडलिक भारमल , त्रिंबक दराडे शरद टिपरे , ज्योती गावंडे , दगडू बांबळे , लोकपंचायतचे हनुमंत उबाळे , राजू भारमल जालिंदर घिगे , चंदर भारमल , उपस्थित होते .. यावेळी आदिवासी नृत्य हॅन्गड वाडी , पेठ्याची वाडी डावाची वाडी येथील ग्रामस्थांनी सादर केले . महिलानी गाणी म्हटले मुलींनी आदिवासी गीते सादर केली.

हिंदू धर्मात दिवाळी सन अत्यन्त महत्वाचा मानला जातो गोडधोड पदार्थ , नवीन कपडे , फटाके , लक्ष्मी पूजन म्हणजे सोने चांदीचे पूजन मात्र हाच दिवाळीचा सन आदिवासी समाजात हा सण वेगळ्या व पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो अकोले तालुक्यातील महादेव कोळी , ठाकर , कातकरी , भिल्ल या जमातीचे लोक दिवाळीची सुरुवातच वाघ बारस (वसू बारस )साजरी करून करतात.

वसू बारस म्हणजेच वाघबारस या दिवशी गुरे चरणारी गुराखी नेहमीप्रमाणे गाई चरण्यास जंगलात जातात या दिवशी सर्व गुराखी उपवास करतात दुपारी या दहा गावातील गुराखी ग्रामस्थ गावच्या सीमेवर असलेल्या वाघ देवाजवळ जमाहोतात . आदिवासी परंपरेनुसार प्रत्येक गावच्या सीमेवर वाघ देवाच्या मूर्तीचा दगडावर ताठ चिरा स्थापन करतात या मूर्तीवर चन्द्र , सूर्य , नागदेवता वाघ देव , मोर आदी चित्रे कोरलेली असतात वाघ देवाला शेंदूर लावून शेतातील नवीन आलेले पीक म्हणजे भात , नागली , वरई उडीद या पिकांचे कणसे वाहून पूजा केली जाते डोंगऱ्या देव , रानभूल , गावदेवी हिरवदेव , निळा देव रानवा लक्ष्मी गाय आदींची विधिवत पूजा होऊन जल्लोष केला जातो या मागे उद्देश आदिवासी त्याचे गुरे ढोरे कायम रानावनात जंगलात कात्यकुट्यात भटकत असतात त्याचे वन्यप्राणी यांच्यापासून संरक्षण व्हावे गुराख्याने सुख शांती लाभो हा आहे .

 

हेही वाचा:अंगणवाडी सेविकांना दोन हजार रुपये दिवाळी भाऊबीजेची भेट

 

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close