fbpx
ताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

*दुःखद बातमी;चप्पू उलटून तीन बुडाले;एन डी आर एफची दाखल होणार*

शेअर करा

*

वडवणी दि 23 प्रतिनिधी

जिल्ह्यातील माजलगाव धरणाच्या बॅक वॉटर मध्ये चप्पू उलटून झालेल्या दुर्घटनेत तीन जणांचा बुडून मृत्यू झाला असल्याची घटना खळवट लिंबगाव येथे घडली. दोन जण किनाऱ्यावर सहीसलामत पोहचले.हे तिघे बेपत्ता असून त्यांना शोधण्यासाठी एन डी आर एफची टीम सकाळी दाखल होणार आहे.

वडवणी तालुक्यातील खळवट लिंबगाव येथे नदीला माजलगाव धरणाचे बॅक वॉटर असल्याने नदीच्या पलीकडे असलेल्या शेतात शेतकरी चप्पूवरून प्रवास करत दररोज जातात आणि सायंकाळी घरी येतात. हे पाच जण कापूस वेचण्यासाठी शेतात गेले होते.सायंकाळी जोरदार वादळ आणि पाऊस सुरू झाल्याने भारत फरताडे,सुशीला फरताडे,आर्यन फरताडे,पूजा माने आणि अंकिता नाईकवाडे हे पाच जण घराकडे परतत असताना वादळामुळे आणि पावसाने चप्पूने हेलकावे खाल्ल्याने चप्पू उलटला त्यामध्ये भारत फरताडे आणि अंकिता नाईकवाडे हे दोघे पोहता येत असल्याने किनाऱ्यावर आले .तर सुशीला फरताडे,मुलगा आर्यन आणि भाची पूजा काळे ह्यांचा बुडून मृत्यू झाला.त्यांचा शोध सुरू असून अद्याप पर्यंत त्यांचे मृतदेह सापडले नसल्याने एन डी आर एफ ला पाचारण करण्यात आले आहे.सकाळी ही टीम पोहचल्यानंतर शोध कार्य पुन्हा सुरू करण्यात येणार आहे.

हेही वाचा:सामूहिक बलात्कार करणाऱ्या चार जणांच्या टोळीला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा-जिल्हा प्रमुख सत्र न्यायालयाचा निकाल

Advertisement

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close