ताज्या घडामोडी

खाजगी ट्रॅव्हल बस आणि सॅनट्रो कार अपघातात चार जण ठार

शेअर करा

खाजगी ट्रॅव्हल बस आणि सॅनट्रो कार अपघातात चार जण ठार

करंजी दि 28 डिसेंबर/विलास मुखेकर

खाजगी ट्रॅव्हल बस आणि सॅनट्रो कार अपघातात चार जण ठार झाल्याची घटना रात्री उशिरा घडली.तिसगाव नजीक देवराई जवळ हॉटेल सुभद्रा येथे घडली.

कल्याण-निर्मल-विशाखापट्टणम रस्त्यावर तालुक्यातील देवराई जवळ रात्री उशिरा खाजगी ट्रॅव्हल बस व सेंट्रो कार मधील अपघातात होऊन चार जण ठार झाले आहेत. तीन जण जागीच ठार झाले तर एक जणांचा रुग्णालयात मृत्यु झाला आहे.बाळासाहेब शंकरराव कदम, वय 60 रा जायगाव ता.परळी जि. बीड,परमेश्वर लक्ष्मण डाके वय 40 रा.धामणगाव ता.पाथ्री जि परभणी आणि केशव विलास बोराटे वय 23 रा मंठा जि जालना असे मृतांचे नावे आहेत.
सुभद्रा हॉटेल समोर त्रिभुनवाडी शिवारात खाजगी बस क्र एम एच 38 x 8555 ही पुण्याहून नांदेडकडे जात असतांना संट्रो कार क्र एम एच 12 सीडी 2917 ही पुण्याच्या दिशेने चाली असतांना यांचा अपघात होऊन सँट्रो कार मधील तीन जण जागीच ठार झाले असून एक जण उपचारा दरम्यान मृत झाला आहे.

हेही वाचा:पोलीस कर्मचाऱ्यास लाच घेताना रंगेहात पकडले

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close