ताज्या घडामोडीप.महाराष्ट्र

*पुणे शहरातील महिलांची ची आवडती बाजारपेठ तुळशीबाग आजपासून खरेदी साठी खुली*

शेअर करा

 

शेखर गौड
पुणे दि,5 जून

शहरातील उपनगरे आणि इतर भागातील बाजारपेठ, दुकाने आता हळूहळू सुरु होत आहेत. मात्र, तुळशीबाग कधी सुरु होणार..? हा महिलावर्गासह अनेकांच्या मनातील प्रश्न आहे. याच प्रश्नावरील उत्तर शोधण्यासाठी आज आणखी एक पाऊल पुढे पडले. तुळशीबागेतील बाजारपेठ सुरु व्हावी, यासाठी व्यापारी संघटनेने दिलेल्या प्रस्तावाला महानगरपालिकेच्या अधिकारी वर्गांनी मान्यता दिली असुन तुळशीबागेतील सुमारे 50 टक्के दुकाने सुरु करण्यात आली.

एका दिवशी संपूर्ण एक बाजू आणि दुसरा दिवशी दुसरी संपूर्ण बाजू (p1p2) तसेच दोन पथारी मधे 5 मिटर चे अंतर अशा पद्धतीने पुण्यातील तुळशीबाग आज सुरु करण्यात आली .या वेळी महिलांनी खरेदीचा आनंद घेतला .अडीच महिन्यापासून बंद असलेली तुळशीबाग बाजारपेठ आज खरेदीसाठी खुलीकरण्यात आली. या वेळी एका बाजूचचे दुकान आणि पथारीवाले यांनी आपली दुकाने खुली केली.शासनाच्या या निर्णयामुळे तुळशीबागेतील व्यापारी यांना दिलासा मिळाला आहे.
तुळशीबागेत ग्राहकांची सुरक्षितता व सोशल डिसन्टसिग चे सर्व नियम पाळून व्यवसाय करणार आहे .आलेल्या प्रत्येक ग्राहकाला सॅनिटायझर , मास्क आणि सोशल डिस्टन्स पाळण्यासाठी आम्ही सांगत आहोत तुळशीबाग लवकरच पुणेकरांच्या सेवेत रुजू झाली आहे असे तुळशीबाग परिसर व्यापारी असोसिएशचे सचिव नितीन पंडीत यांनी सांगितले.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close