fbpx
क्राईमताज्या घडामोडी

*वाळु उपसा करणाऱ्या दोन बोटी निमगांव बोडखा परिसरात जप्त*

शेअर करा

 

 

आष्टी दि 10 नोव्हेंबर ,प्रतिनिधी

Advertisement

बोटीच्या साहाय्याने नदीतून चोरट्या मार्गाने वाळू उपसा सुरू असल्याने तहसीलदार आणि अंभोरा पोलिस यांनी संयुक्त कारवाई करत साडेसात लाखांचे साहित्य जप्त केले आहे.
तहसीलदार यांनी पहिलीच बेधडक कारवाई केल्याने वाळु माफियांच्या झोपा उडाल्या आहेत.
आष्टी तालुक्यातील निमगांव बोडखा परिसरात दोन बोटीच्या माध्यमातून सिना पात्रातुन वाळु उपसा होत असल्याचे तहसीलदार यांना समजाताच त्यांनी अंभोरा पोलिसांच्या मदतीने सोमवारी सायकाळच्या सुमारास कारवाई करत दोन बोटी, वाळु, व इतर साहित्य असे 7 लाख 41 हजार रूपयाचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई तहसीलदार राजाभाऊ कदम, नायब तहसीलदार प्रदिप पांडुळे अंभोरा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर कुकलारे यांच्या टीमने केली.
सध्या नद्यांमध्ये पाणी असल्याने ही वाळू उपसा बोटीच्या साहाय्याने केले जाते.

हेही वाचा:इ पेमेंट दिल्याचे खोटे एस एम एस पाठवून वस्तू विकत घेणारी टोळी पकडली

 

Advertisement

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close