अतिवृष्टी:केज तालुक्यात घरात पाणी घुसले,पूल वाहून गेले
अतिवृष्टी,

अतिवृष्टी:केज तालुक्यात घरात पाणी घुसले,पूल वाहून गेले

केज,
अतिवृष्टी,रात्री सुरू झालेल्या अति मुसळधार पावसाने बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात हाहाकार माजविला. 
केज अंबाजोगाई रस्त्यावरील तात्पुरता तयार करण्यात वाहून गेल्याने आसपासच्या घरात पाणी शिरले.
त्यामुळे या मुख्य रस्त्यावरील वाहतूक बंद झाली आहे.याचा फटका अंबाजोगाई वरून केज कडे आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांवर होत आहे. अंबाजोगाई कडे जाणारा हा मुख्य रस्ता असल्याने  वाहतूक खोळंबली आहे. 
याच तालुक्यातील अंबाजोगाई- कळंब मुख्य मार्गावरील सावळेश्वर पैठण जवळील नदीला पूर आल्याने येथील पूल पाण्याखाली गेला असल्याने हा मार्गही बंद झाला आहे.

मांजरा नदीच्या बाजूला असलेल्या गावांमधे पाण्याचा फुगवटा निर्माण झाल्याने अनेक गावांमध्ये पाणी शिरले.नायगाव मध्ये उंदरी नदीचा नदीला पूर आल्याने नायगाव मध्ये शिरलं. अनेक  जनावरे पाण्यात  गेले.नदीच्या पलीकडे राहणारे नागरिक अडकून पडले.सोनिजवळा,आनंदगाव,इस्थळ,आपेगाव,बनकारंजा  येथील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे 

आणखी वाचा :RR vs SRH,IPL 2021,सनरायझर्स हैदराबादने राजस्थान रॉयल्सचा ७ गडी राखून पराभव केला
 

Share this story