एमएचसीईटी 2021साठी अर्ज भरायला सुरुवात
एमएचसीईटी 2021साठी अर्ज भरायला सुरुवात

मुंबई दि 9 जून ,

इयत्ता बारावी नंतर अभियांत्रिकी शाखेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सरकारने गुड न्यूज दिली आहे.एमएचसीईटी 2021 साठी अर्ज भरायला सुरुवात झाली असून 7 जुलै 2021 रात्री 11:59 pm पर्यंत सुरू असणार आहे.

राज्य सरकारने राज्यातील बारावीत असलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा देणारी बातमी दिली आहे.यंदा 12 वी बोर्डाच्या परीक्षा रद्द झाल्यानंतर पुढील प्रक्रिया सुरू झाली आहे.अभियांत्रिकी साठी एमएचसीईटी 2021 प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असल्याचे मंत्री उदय सामंत यांनी ट्विटरद्वारे सांगितले आहे.

कशी असणार प्रक्रिया
विद्यार्थ्यांनी HTTPS://mhcet2021.mhcet.org या वेबसाईटवर जाऊन तिथे रजिस्ट्रेशन करायचे आहे.या वेबसाईटवर एमएचसीईटी 2021 संबंधीची सर्व प्रक्रिया विशद केली आहे.बारावीची परीक्षा होऊ न होऊ मात्र व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

Share this story