ओबीसी व्हीजेएनटी जनमोर्चाच्या प्रदेश महिला सरचिटणीसपदी मंगल भुजबळ यांची नियुक्ती
ओबीसी व्हीजेएनटी जनमोर्चाच्या प्रदेश महिला सरचिटणीसपदी मंगल भुजबळ यांची नियुक्ती

आष्टी। प्रतिनिधी
बहुजन विकास व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार पुणे येथे ओबीसी आरक्षण संदर्भात चर्चा करण्यासाठी आले असता तेथील छोटेखाणी कार्यक्रमात ओबीसी व्हीजेएनटी जनमोर्चाच्या प्रदेश महिला सरचिटणीसपदी मंगल भुजबळ यांना मंत्री विजय वडेट्टीवार व ओबीसी व्हीजेनटीचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब सानप यांच्या हस्ते निवडीचे पत्र देऊन नियुक्ती करण्यात आली.

मंगल भुजबळ यांचे सामाजिक कार्यातील योगदान पाहून त्या गेल्या १५ वर्षापासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत असून त्या महिलांचे विविध प्रश्न शासन दरबारी सोडवण्यासाठी व महिलांसाठी विविध सामाजिक उपक्रम राबवून त्यांच्या सक्षमीकरणासाठी त्यांनी योगदान दिले आहे . मजबूत महिला संघटन व त्यांचे प्रश्न व्यवस्थित हाताळण्याच्या कौशल्यामुळे बहुजन समाजासाठी त्यांच्याकडे सक्षम बहुजन चेहरा म्हणून पाहिले जात आहे. त्यांच्या आजपर्यंतच्या सामाजिक कार्यासाठी त्यांना महाराष्ट्र शासनाचा आदर्श युवती पुरस्कार व अहिल्यादेवी होळकर पुरस्कार प्राप्त झालेले आहे.त्यांच्या या कामातून त्यांची प्रदेश महिला सरचिटणीस पदी नियुक्ती केल्याचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले ओबीसी व्हीजेएनटी जनमोर्चाचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी महाराष्ट्र भर संघटनेचे जाळे मजबूत केले असून येणाऱ्या काळात ओबीसी व्हीजेएनटी वरील होणारा अन्याय संघटना कदापी सहन करणार नसून वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून न्याय मिळवू असे बोलताना बहुजन विकास व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले यावेळी महिला प्रदेशअध्यक्ष साधना राठोड आदी सह सर्व प्रदेश पदाधिकारी तसेच अहमदनगर शहरातील माजी महापौर भगवान फुलसुंदर , नगरसेवक बाळासाहेब बोराटे , सुनील भिंगारे , शहर अध्यक्ष बाळासाहेब भुजबळ , विलास भुजबळ , राजेश सटाणकर , सुषमा पडोळे , विशाल वालकर , अभिषेक बोराटे, रमेश सानप उपस्थित होते .

Share this story