अहमदनगर जिल्ह्यातील ६१ गावांमध्ये पुन्हा कडक लॉक डाऊन- जिल्हाधिकारी यांचा आदेश
 अहमदनगर जिल्ह्यातील ६१ गावांमध्ये पुन्हा कडक लॉक डाऊन- जिल्हाधिकारी यांचा आदेश 

अहमदनगर

अहमदनगर जिल्ह्यामध्ये दररोज 500 ते 800 कोरोना रुग्णांची संख्या आढळून येत आहे.

त्यामुळे जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट हा पाच टक्के पेक्षा जास्त आहे.

या अनुषंगाने जिल्ह्यातील 20 पेक्षा जास्त सक्रिय कोरोना बाधित रुग्ण संख्या असलेल्या 61 गावांमध्ये जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांनी टाळेबंदी घोषित केली आहे.

या प्रतिबंध गावांमध्ये अकोले तालुक्यातील तीन, कर्जत तालुक्यातील दोन, कोपरगाव तालुक्यातील एक ,नेवासा तालुक्यातील एक, पारनेर तालुक्यातील सहा, पाथर्डी तालुक्यातील एक, राहाता तालुक्यातील 7, संगमनेर तालुक्यातील 24 ,शेवगाव तालुक्यातील चार ,श्रीगोंदा तालुक्यातील नऊ, श्रीरामपूर तालुक्यातील तीन, अशा एकूण 61 गावांचा समावेश आहे.

वाढत्या कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी गाव बंद करण्याचा आदेश दिला आहे. सदर क्षेत्रातील किराणा दुकाने सकाळी आठ ते अकरा या वेळेत सुरू करण्यात ठेवण्यास परवानगी असणार आहे.

 या गावांमधील सर्व शाळा आणि धार्मिक प्रार्थनास्थळे पूर्णपणे बंद असणार आहे.

 कोरोना रुग्ण संख्या जास्त असलेल्या गावांमध्ये प्रतिबंधित क्षेत्र  जाहीर करणे, पोलिस बंदोबस्त देणे ,

जनता कर्फ्यू आदीच्या माध्यमातून गाव बंदी करणे अशा प्रकारच्या उपाययोजना प्रशासनाच्यावतीने करण्यात येत आहेत .

याच अनुषंगाने झालेल्या बैठकीमध्ये दहापेक्षा जास्त सक्रिय कोरोना  बाधित रुग्ण संख्या असणाऱ्या गावांच्या

ठिकाणी आता प्रतिबंधित क्षेत्र  घोषित करून कोरोना पती प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याबाबत निर्णय घेण्यात आला.

त्या त्या तालुक्यातील तहसीलदारांना प्रतिबंधित क्षेत्र  करण्यासंदर्भात निर्देशित करण्यात आले होते.तथापि दहापेक्षा

जास्त सक्रिय कोरोना बाधित असणाऱ्या रुग्णांच्या कोरोना  बाधित रुग्ण संख्या असणाऱ्या गावांमध्ये ही प्रतिबंधात्मक

उपाय योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी होत नसल्याची बाब निदर्शनास आली. त्या अनुषंगाने आरोग्य विभाग जिल्हा परिषद

यांच्याकडील बाधित रुग्ण संख्येच्या आकडेवारीनुसार जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी जिल्ह्यातील दहापेक्षा जास्त सक्रिय

कोरोना बाधित रुग्ण संख्या असणाऱ्या गावांमध्ये अत्यावश्यक सेवा दवाखाने मेडिकल टेस्टिंग सेंटर वगळता सर्व स्थापना

दुकाने वस्तू विक्री सेवा के 4 ऑक्टोबर पासून 13 ऑक्टोबर पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.  

या क्षेत्रांमध्ये पाच पेक्षा जास्त व्यक्तीस एकत्र येण्यास मनाई असणार आहे.

पोलीस प्रशासनाने स्थानिक प्राधिकरणाच्या मदतीने सर्व पर्यायी रस्ते बंद करून इंट्री आणि एक्झिट पोल पॉईंट्स

द्वारे खुले ठेवावे. अशा सर्व प्रकारच्या मालवाहतुकीचा परवानगी राहिली सदरचे गाव ओलांडून पुढे जावयाचे असल्यास

सदर सदर गावांमध्ये न थांबण्याच्या अटीवर पुढे जाण्यास परवानगी राहील.या गावांमध्ये लग्न समारंभास मनाई असणार

आहे.तसेच या गावांमध्ये तहसीलदार यांना पूर्वसूचना देऊन अंत्यविधी दशक्रिया विधी यासाठी वीस व्यक्तींना उपस्थित

राहण्याची परवानगी असेल या सर्व बाबींचा परिस्थितीबाबत सात दिवसानंतर आढावा घेण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी

यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे.

 या विविध तालुक्यातील गावांमध्ये अकोले तालुक्यातील लिंगदेव, विरगाव ,परखतपूर ,कर्जत तालुक्यातील खांडवी ,बाभुळगाव ,दुमाला,

कोपरगाव तालुक्यातील गोधेगाव ,नेवासा तालुक्यातील कुकाना ,

पारनेर तालुक्यातील वडनेर बुद्रुक ,कानूर पठार ,गोरेगाव, दैठणे गुंजाळ ,जामगाव, भाळवणी ,

पाथर्डी तालुक्यातील तिसगाव, राहता तालुक्यातील भगवतीपुर,पिंपरी ,निर्मळ ,अस्तगाव ,कोराळे, लोणी बुद्रुक, लोणी खुर्द,

कोलार बुद्रुक, संगमनेर तालुक्यातील 24 गावांमध्ये गुंजाळवाडी ,शेडगाव, निमगाव जाळी ,आश्वी बुद्रुक, आश्वी खुर्द ,पारेगाव बुद्रुक,

पानोडी ,शिबलापुर ,बोटा, उंबरी ,पिंपरणे ,वेल्हाळे, खळी, देवगाव ,घुलेवाडी, कोल्हेवाडी ,वडगाव लांडगा ,तळेगाव, घारगाव ,

चंदनापुरी, कनोली, निमोन ,वडगाव पान ,सायखिंडी ,शेवगाव तालुक्यातील भातकुडगाव, घोटन, दहिगावने, आव्हाने बुद्रुक ,

श्रीगोंदा तालुक्यातील लोणी व्यंकनाथ ,घारगाव, बेलवंडी मढेवडगाव, शेडगाव, येळपणे ,कवठा, कोळगाव ,काष्टी ,श्रीरामपूर

तालुक्यातील बेलापूर खुर्द ,उक्कलगाव ,कारेगाव, या एकूण 61 गावांचा समावेश यामध्ये आहे

Share this story