किती झाला पाऊस ?केज तालुक्यात जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस, धारुरलाही अति मुसळधार
अति मुसळधार

बीड,
24 तासात बीड जिल्ह्यातील केज आणि  धारूर  तालुक्यात सर्वाधिक पाऊस झाल्याची नोंद झाली आहे.

हा पाऊस अति मुसळधार झाला आहे. 
बीड जिल्ह्यात आज सकाळपर्यंत 65.6 मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

जिल्ह्यातील केज तालुक्यातील अनेक गावे बाधित झाले आहेत.

या अति मुसळधार पावसाने शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे . 
केज तालुक्यात 126 मिलीमीटर पावसाची नोंद झाली.

या तालुक्यात केज महसूल मंडळात 102 मिमी, युसुफवडगाव 211 मिमी,हनुमंतपिंपरी 90.3, होळ 208.3, विडा 94.8, बनसारोळा 115.5,नांदूरघाट 59 असे एकूण 126 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. 


धारूर तालुक्यातील धारूर मोह्खेड आणि तेलगाव या तीन महसूल मंडळात 100 हून अधिक मिलीमीटर पाऊस झाला. या तालुक्यात एकूण 125.5 मिलीमीटर इतका पाऊस झाला. 


जिल्ह्यात सर्वात कमी पाउस आष्टी तालुक्यात 7.5 इतका मिमी पाऊस झाला आहे. 


इतर तालुक्याची पावसाची आकडेवारी या प्रमाणे
बीड 56.6 , पाटोदा 23, गेवराई 77.6 ,माजलगाव 44 .9 ,अंबाजोगाई 117. 5,

परळी 68.4,वडवणी 40.6 , शिरूर 17.4 
दरम्यान 28 रोजी उशिरापर्यंत अति मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.    

 

Share this story