*अहमदनगर जिल्ह्यात 13 बाधित,15 डिस्चार्ज*
*अहमदनगर जिल्ह्यात 13 बाधित,15 डिस्चार्ज*

 

अहमदनगर दि 5 जुलै टीमसीएम न्यूज

अहमदनगर जिल्हा रुग्णालयात आलेल्या अहवालामध्ये 13 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून 15 बाधित बरे होऊन घरी परतले.

अहमदनगर जिल्ह्यातील १५ रुग्ण आज बरे होऊन घरी परतले. जिल्ह्यातील कोरोनावर मात केलेल्या रुग्णांची संख्या आता ४०० झाली आहे. आज नगर मनपा ०९, नगर ग्रामीण ०४, संगमनेर आणि पारनेर प्रत्येकी ०१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. सध्या उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या १६२ इतकी आहे, अशी माहिती नोडल अधिकारी डॉ.बापूसाहेब गाडे यांनी दिली.

नगर शहरातील सावेडी भागातील ६१ वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह. जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये आज सकाळी या महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आढळून आला. त्यानंतर आलेल्या अहवालात
नगर तालुक्यात नवनागापूर येथे ०३, नगर शहरात पदमानगर ०२, नाईकवाडपुरा (संगमनेर) ०१, श्रीरामपूर ०१,गवळी वाडा (भिंगार ) ०२, खेरडा (पाथर्डी) ०२, राहाता ०१ यांचा समावेश आहे.

Share this story