*पाथर्डीत कारागृहातील 8 आरोपींसह 20 जण कोरोना बाधित*
*पाथर्डीत कारागृहातील 8 आरोपींसह 20 जण कोरोना बाधित*

 

पाथर्डी दि 16 प्रतिनिधी
आज दिवसभरात पाथर्डी तालुक्यातील 20 जणांना कोरोना कोरोनाची बाधा झाल्याचे आढळून आले आहे यामध्ये पोलीस ठाण्यातील 8 आरोपींचा समावेश आहे. तर दिलासादायक म्हणजे 29 जणांना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे.

या पॉझिटिव्ह रुग्णात पाथर्डी पोलीस स्टेशनच्या कारागृहातील 8 आरोपींचा समावेश आहे
दि 16 ऑगस्ट रोजी दिवसभरात शहर आणि तालुक्यातील 19 व्यक्ती पाथर्डीच्या कोविड सेंटरच्या तपासणीत कोरोनाने बाधित झालेले आढळून आले आहे.तर अहमदनगरच्या प्रयोगशाळेतून 1 व्यक्तीचा पॉझिटिव्ह अहवाल आला आहे.त्यामुळे आज एकूण 20 जणांना कोरोनाची लागण झाली आहे

तालुका आरोग्य अधिकारी डॉ भगवान दराडे,कोविड सेंटरचे प्रमुख डॉ महेंद्र बांगर यांच्या पथकाने 96 जणांची रॅपिड अँटीजन चाचणी केली.त्यात 19 व्यक्ती कोरोना विषाणूने बाधित झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

*भंडारदरा भरले;विसर्ग सुरू*

शेवाळे गल्ली 01,नाथनगर 02,एडके कॉलनी 02,आनंदनगर 02,पाथर्डी पोलीस स्टेशन 08,खरवंडी कासार 03,टेंभुर्णी (बीड) 01, आनंदगाव (शिरूर कासार ) 01 या भागातील रुग्ण आढळून आले.

Share this story