*आष्टीत रॅपिड अँटीजन टेस्ट मध्ये 33 कोरोना बाधित*
*आष्टीत रॅपिड अँटीजन टेस्ट मध्ये 33 कोरोना बाधित*

दि 19 प्रतिनिधी
आज  आष्टी येथील 3 विविध ठिकाणी करण्यात येत असलेल्या कोरोना रॅपिड अँटीजन टेस्ट मध्ये  33 रुग्ण बाधित आढळून आले असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली .
बीड जिल्ह्यातील पाच शहरात कोरोना अँटीजन टेस्ट  घेतली जात आहे.आष्टी शहरात दोन दिवसापासून ही टेस्ट सुरू आहे .उद्याही असणार आहे. सकाळपासून या टेस्ट ला सुरुवात झाली .गणेश विद्यालय,आष्टी कन्या शाळा आणि आष्टी बॉईज विद्यालयात या टेस्ट घेतल्या जात आहेत.
यासाठी तालुका आरोग्य अधिकारी डॉ संतोष कोठूळे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ गुट्टे, डॉ नितीन मोरे, डॉ श्रीमती सुम्बे, डॉ श्री मूळे, डॉ श्रीमती मोरे यांच्यासह तीन आरोग्य सहाय्यक ,18 आरोग्य सेवक आणि 9 लॅब टेक्निशियन कार्यरत आहेत.
दिवसभरात 600 जणांचे या रॅपिड अँटीजन टेस्ट साठी स्वब घेण्यात आले त्यामध्ये 33  जणांना कोरोना बाधा झाली असल्याचे आढळून आले आहे.

आष्टी शहरातील सर्व प्रकारच्या व्यावसायिक- दुकानदारांची जसे किराणा, कपडे, सराफा,  किराणा रिटेल होलसेल, आडत ,सिड्स अँड फर्टिलायझर्स ,परमिट व दारु दुकाने ,मेडिकल, जनरल स्टोअर्स, नाभिक ,फोटो स्टुडिओ, फळ-भाजी विक्रेत्यांचे, दूध विक्रेते, पेट्रोल पंपावरील व बँकामधील कर्मचारी यासह  सर्व प्रकारच्या विविध व्यवसायिकांची कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मोठ्या संख्येने तपासणी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

Share this story