सोलापूर-अक्कलकोट रस्त्यावर कुंभारी जवळ भीषण अपघात 5 ठार
सोलापूर-अक्कलकोट

सोलापूर,

   स्वामी समर्थांचे दर्शन करून सोलापूरकडे येत असलेल्या प्रवासी जीपचा अपघात झाला. हा अपघात सोलापूर-अक्कलकोट

रोडवरील कुंभारीजवळ सकाळी १० वाजता झाला.  या अपघात जण 5 ठार झाले.

अक्कलकोटहून सोलापूरकडे येणाऱ्या एमएच १३ एएक्स १२३७ या जीपचे पुढील टायर फुटल्याने सोलापूर - अक्कलकोट

रोडवर कुंभारी येथील इंडियन ऑईल पेट्रोल पंपासमोर गाडी उलटली. कार्तिकी एकादशी निमित्त पंढरपूर, अक्कलकोट व

गाणगापूर असा प्रवास करणाऱ्या व्यक्तींचा यात समावेश आहे. पाच जणाला आपला जीव गमवावा लागला. 2 गंभीर जखमी

असून इतर 7 प्रवासी जखमी झाले आहेत.

अपघातात जखमी झालेल्या लोकांना नागरिकांनी जवळच्या दवाखान्यात हलवले असून, वळसंग पोलिस घटनास्थळी दाखल

झाले आहेत.गाडी रस्त्याच्या खड्ड्यात जावुन पडली.

आणखी वाचा: जिल्हा रुग्णालय जळीत प्रकरण-जिल्हा शल्य चिकित्सक यांची चौकशी

प्राथमिक माहितीनुसार जीप चालक मोबाईल वर बोलत असल्याने हा अपघात झाल्याचे प्रवाशांनी सांगितले,

पोलिसांना सुरुवातीला एका व्यक्तीची ओळख पटली होती नंतर पाचपैकी चौघांची ओळख पटली असून सर्व

अक्कलकोट तालुक्यातील आहेत. एका महिलेची मात्र ओळख पटली नाही मयतांची नावे पुढीलप्रमाणे आहेत...

कट्ट्यावा यल्लप्पा बनसोडे वय 55

बसवराज यल्लप्पा बनसोडे वय 42

आनंद इर्राप्पा गायकवाड, वय 25 रा. ब्यागेहाळी, ता.अक्कलकोट, लक्ष्मण मुरलीधर शिंदे, 42, बनजगोळ तालुका

अक्कलकोट व एक अनोळखी महिला अंदाजे वय 35. आहे जखमीवर सोलापूर मधील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Share this story