जिल्हा रुग्णालय जळीत प्रकरण-जिल्हा शल्य चिकित्सक यांची चौकशी
जिल्हा रुग्णालय जळीत

नगर,

जिल्हा रुग्णालय जळीत प्रकरणी निलंबित असलेले जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सुनील पोखरणा यांची पोलिसांनी चौकशी केली.

तपासी अधिकारी संदीप मिटके यांनी त्यांना चौकशी साठी बोलावले होते. दुपारी हे अधिकारी तोफखाना पोलिस ठाण्यात दाखल झाले.

पोलीस उपविभागीय अधिकारी संदीप मिटके यांनी त्यांची चौकशी केली.

अहमदनगर जिल्हा शासकीय रुग्णालयात दिनांक ६ नोव्हेंबर रोजी सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास कोविड अतिदक्षता

विभागास आग लागली होती. यामध्ये ११ रुग्णांचा मृत्यू झाला. या संदर्भात तोफखाना पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा

दाखल करण्यात आला होता. त्यानंतर तपासी अधिकारी संदीप मिटके यांनी एक वैद्यकीय अधिकारी आणि तीन परिचारिका यांना

अटक करण्यात आली होती. त्यानंतर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सुनील पोखरणा यांनी न्यायालयातून अटकपूर्व जामीन मंजूर

केला आहे. दरम्यान त्यांना आज पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले होते. त्यांची चौकशी करण्यात आली. बाहेर आल्यानंतर

त्यांनी सांगितले कि, जळीत संदर्भात ही चौकशी करण्यात आली आहे. नेमकी घटना कशी घडली यासंदर्भात पोलिसांनी माहिती

विचारल्याचे त्यांनी सांगितले.त्यानंतर इतरहि  अधिकारी कर्मचारी यांची चौकशी करण्यात आली.

अधिक वाचा :अखेर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सुनील पोखरणा निलंबित

Share this story