बीडच्या अविनाश साबळे चा सरंक्षण मंत्री राजनाथसिंह यांच्या हस्ते सन्मान
अविनाश साबळे

पुणे-प्रतिनिधी 

बीड जिल्ह्यातील ओलीम्पिक क्रीडापटू अविनाश साबळे याचा संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.निमित्त होते सरंक्षण विभागातील ओलीम्पिक क्रीडा स्पर्धेत भाग घेतलेल्या खेळाडूंचा सिंह यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

बीड जिल्ह्यातील अविनाश साबळे याने टोकियो ओलीम्पिक स्पर्धेत सहभाग घेतला. अविनाश साबळे याने या स्पर्धेत स्वतःचे नव्याने राष्ट्रीय रेकॉर्ड केले.

सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते आज  लष्करी क्रीडा संस्थेत सुभेदार नीरज चोप्रा स्टेडियमचे उद्घाटन झालं.देशात क्रीडा प्रकारांचे महत्व वाढत असून भारत एक क्रीडा प्रधान देश व्हावा हे आपले स्वप्न असल्याचं ते म्हणाले. भारत सरकार क्रीडाक्षेत्रात गुणवत्ता वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न करत आहेत त्या केवळ सरकारी योजना नसून एक आंदोलन आहे. असेही ते म्हणाले.

  आपल्या भाषणात छत्रपती शिवाजी महाराज,राजमाता जिजाबाई, रामदास स्वामी आणि दादोजी कोंडदेव यांचा उल्लेख करत पुण्याच्या इतिहासाला उजाळा दिला.  ऑलिंपिक स्पर्धेत ऐतिहासिक सुवर्णपदक पटकावणाऱ्या नीरज चोप्राचा सन्मान त्यांनी केला.

Share this story