बीड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या लसीकरणास सुरुवात
15 ते 18

बीड

राज्य सरकारने 15 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्याचा निर्णय घेतल्यानंतर बीड जिल्ह्यातील 50 शाळांमध्ये 15 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले.

कोविडचा संभाव्य धोका लक्षात घेत धनंजय मुंडे यांनी घेतला स्वाराती वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाचा आढावा

आष्टी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र टाकळसिंग अंतर्गत 15 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. टाकळसिंग, जामगाव, पारगाव या शाळेमध्ये लसीकरण करण्यात आले. तालुक्यातील विविध केंद्र निवडलेल्या शाळांमध्ये हे लसीकरण केले  जाणार आहे. या लसीकरण सत्राला  गटशिक्षणाधिकारी सुधाकर यादव  आणि वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन मोरे  यांनी भेटी दिल्या. जिल्हा परिषद माध्यमिक शाळा टाकळसिंग शाळेचे मुख्याध्यापक महेश शिंदे यांनी सांगितले कि, आमच्या शाळेत 84 हून अधिक विद्यार्थ्यांना लस देण्यात आली आहे. लवकरच सर्व विद्यार्थी यांचे लसीकरण पूर्ण होईल.

१५ ते १८ वर्षांच्या मुलांनाही कोरोना प्रतिबंधक लस देण्यासाठी आज पासून बीड जिल्ह्यात सुरुवात झालीय. आरोग्य विभागाने ५० ठिकाणी यासाठी लसीकरण सत्रांचे आयोजन केले आहे. नव्या निर्णयानंतर जिल्ह्यात १५ ते १८ वर्षे वयोगटातील १ लाख ४२ हजार ९१९ मुले असून त्यांचे लसीकरण करण्यात येणार आहे. यासाठीची पूर्व तयारी आरोग्य विभागाने केली असून पहिल्याच दिवशी ५० ठिकाणी लसीकरण सत्र आयोजित केले गेले आहे.

मुलांना कोव्हॅक्सिन ही भारतीय बनावटीची कोरोना प्रतिबंधक लस दिली जाणार आहे. यासाठी कोविन अॅपवर नोंदणी करावी लागते, ऐनवेळीही नोंदणी करून लस घेता येणे शक्य आहे. लसींचा मुबलक साठा सध्या आरोग्य विभागाकडे आहे. शाळा आणि महाविद्यालयांमध्ये या लसीकरण सत्रांचे आयोजन करण्यात आलं आहे.

Share this story