ट्रक आणि बसच्या अपघातात 4 जण ठार
 bus collides with truck in beed maharashtra

अंबाजोगाई

लातूरहुन औरंगाबाद जाणाऱ्या एसटी बस आणि ट्रकचा अपघात होऊन 4 जण ठार झाले.bus collides with truck in beed maharashtra

ही घटना लातूर अंबाजोगाई रस्त्यावर बरदापुर वळणावर सायगाव जवळ पहाटेच्या सुमारास घडली.

याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लातूर हुन औरंगाबाद कडे जात असताना पहाटेच्या सुमारास धुक्यामुळे      ट्रक आणि बस मध्ये समोरासमोर अपघात झाला.या बसमध्ये एकूण 17 प्रवासी प्रवास करत होते.

या अपघातात 4 जण जागीच ठार झाले .हे सर्व बस मधील आहेत .मृतात एस ती वाहकाचा समावेश आहे.घटना घडल्यानंतर जवळच असलेल्या सायगाव बस  स्थानक जवळील नागरिकांनी मदत केली.जखमींना दवाखान्यात दाखल करण्यात आले.हा अपघात इतका भयानक होता की, यामध्ये ट्रकचा चक्काचूर झाला.

bus collides with truck in beed maharashtra  मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

Maharashtra Beed Bus Accident एस टी बसच्या समोरून डाव्या बाजूला जोरदार धडक बसल्याने बसचा वाहक ठार झाला.अपघातानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.या अपघातानंतर या रस्त्यावर वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती.बस आणि ट्रक एकमेकांपासून दूर काढण्यासाठी    क्रेन चा वापर करण्यात आला.

Share this story