निळवंडे धरणाच्या कालव्याचे अपूर्ण काम पूर्ण करावे या मागणीसाठी शेतकऱ्यांचा मोर्चा
निळवंडे
1.  उजव्या उच्चस्तरीय कालव्यात पाणी सोडून शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी मिळावे यासाठी प्रवरा नदीवरील जलसेतूचे काम अत्यंत तातडीने पूर्ण करा.
2.  उजव्या व डाव्या उच्चस्तरीय कालव्यांची शिवारातील अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करा.
3.  डोंगरांच्या पायथ्यापर्यंतचे क्षेत्र सिंचित व्हावे यादृष्टीने कालवे व उप कालव्यांचा विस्तार करून, ही विस्तारीत कामे तातडीने पूर्ण करा.
4.  भंडारदरा व निळवंडे जलसाठ्याचे संयुक्त जलव्यवस्थापन करून अकोले तालुक्यातील  शेतीला बारमाही पाणी द्या.
या मागण्या करण्यात आल्या आहेत.  

 

अकोले- प्रतिनिधी 
निळवंडे धरणाच्या पाण्यापासून अनेक वर्षापासून  वंचित राहिलेल्या गावांच्या वतीने उजव्या उच्चस्तरीय कालव्याचे प्रलंबित काम तातडीने पूर्ण करावे आणि निळवंडे धरणाचे हक्काचे पाणी मिळावे या मागणीसाठी कालवे हक्क समिती आणि गावकऱ्यांच्या वतीने अकोले येथील तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी शेतकरी आपल्या ट्रक्टर सह या मोर्चामध्ये सहभागी झाले होते.  

सकाळी सर्व शेतकरी एकत्र येत त्यांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला . यामध्ये महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. 

मोर्चा नंतर बाजारतळावर  सभा घेण्यात आली यावेळी आमदार किरण लहामटे, कॉ.डॉ.अजित नवले,कॉ कारभारी उगले ,शिवसेनेचे मच्छिंद्र धुमाळ,आप्पा आवारी,परबत नाईकवाडी,सुरेश भिसे,महेश नवले,बाळासाहेब भोर,विनय सावंत,व इतर असंख्य मान्यवर उपस्थित होते या वेळी सभेला मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते.

अकोले तालुक्यातील अंबड, धामणगाव आवारी, धुमाळवाडी, औरंगपूर, पानसरवाडी, परखतपूर व वाशेरे या गावांसाठी उजवा उच्चस्तरीय कालवा आणि  बहिरवाडी, ढोकरी, टाकळी, खानापूर, गर्दनी व तांभोळ येथील शेतकऱ्यांसाठी डावा उच्चस्तरीय कालवा मंजूर करण्यात आला. 

निळवंडे


       उजव्या उच्चस्तरीय कालव्याचे काम तीन वर्षांपूर्वीच पूर्ण झाले. मात्र नदी पात्रातील जलसेतूचे काम गेली अनेक वर्षे रेंगाळत ठेवल्यामुळे उजव्या उच्चस्तरीय कालव्यामध्ये पाणी सोडता आलेले नाही. अकोले तालुक्यातून इतर तालुक्यांमध्ये पाणी वाहून नेण्यासाठी निम्नस्तरीय कालव्यांची कामे अत्यंत जलद गतीने सुरू आहेत. अत्यंत कठीण डोंगर फोडून व रस्त्यांवर पूल बांधून, ओढे नाले ओलांडत ही निम्नस्तरीय  कालव्यांची कामे अतिजलद गतीने पूर्ण केली जात आहेत. उच्चस्तरीय कालव्यामध्ये पाणी सोडण्यासाठी आवश्यक असलेल्या जलसेतुचे काम मात्र हेतुतः वर्षानुवर्षे अपूर्ण ठेवले जात आहे. 
उजव्या व डाव्या उच्चस्तरीय कालव्यांचे सिंचन क्षेत्र विस्तारण्यासाठी दिलेले पुरवणी प्रस्तावही प्रलंबित आहेत. शेतकऱ्यांच्या मनात याबाबत मोठा असंतोष खदखदतो आहे. अशा पार्श्वभूमीवर तालुक्यातील विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत, पुन्हा एकदा तालुक्यात पाणी हक्काचा लढा सुरू केला आहे.

आणखी वाचा: पालकमंत्री धनजंय मुंडे यांचा मराठवाडीपासून अतिवृष्टी दौरा सुरु


 गावोगावच्या ग्रामस्थांनी याकामी पुढाकार घेत सुरू केलेल्या आंदोलनात अकोले येथे भव्य मोर्चा काढून मागण्या करण्यात आल्या त्यामध्ये 
1.  उजव्या उच्चस्तरीय कालव्यात पाणी सोडून शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी मिळावे यासाठी प्रवरा नदीवरील जलसेतूचे काम अत्यंत तातडीने पूर्ण करा.
2.  उजव्या व डाव्या उच्चस्तरीय कालव्यांची शिवारातील अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करा.
3.  डोंगरांच्या पायथ्यापर्यंतचे क्षेत्र सिंचित व्हावे यादृष्टीने कालवे व उप कालव्यांचा विस्तार करून, ही विस्तारीत कामे तातडीने पूर्ण करा.
4.  भंडारदरा व निळवंडे जलसाठ्याचे संयुक्त जलव्यवस्थापन करून अकोले तालुक्यातील  शेतीला बारमाही पाणी द्या.
या मागण्या करण्यात आल्या आहेत.  

छायाचित्रे: नंदकुमार मंडलिक, अकोले  
 

Share this story