ब्रिजला धडकून कार मधील चौघांचा मृत्यू; एक जखमी
ब्रिजला धडकून कार मधील चौघांचा मृत्यू
सोलापूर 
सोलापूर-विजापूर महामार्गावरील कवठे गावाजवळील ब्रिजला धडकून कार मधील चौघांचा मृत्यू झाला असून एक जण जखमी झाला आहे. हा अपघात बुधवारी पहाटे चारच्या सुमारास झाला. अपघातातील मयत व जखमी हे सर्व कर्नाटकातील आहेत.
 अरुण कुमार लक्ष्मण (वय 21),  महीबूब मोहम्मद अली मुल्ला (वय 18),  फिरोज सैफसाब शेख (वय 20),  मुन्ना केंभावे (वय 21, सर्व राहणार - यरकल केंडी,  तालुका सिंदगी,  जिल्हा विजापूर, कर्नाटक) अशी अपघातात मरण पावलेल्या यांची नावे आहेत.
 अरुण कुमार लक्ष्मण व इतर जखमी हे बुधवारी पहाटे दोनच्या सुमारास कार क्रमांक के ए 32 एन 24 84 मध्ये बसून विजापूर ते सोलापूर नवीन महामार्गावरून येत होते. पहाटे चारच्या सुमारास विजयपूर महामार्गावरील नवीन कवठे गावाजवळील ब्रिजला कारची धडक बसून झालेल्या अपघातात कार मधील सर्व जण गंभीर जखमी झाले.  या अपघाताची माहिती मिळताच सलगर वस्ती पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस फौजदार आर. ए. जाधव यांनी घटनास्थळी जाऊन सर्व जखमी यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. परंतु, वरील चौघांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी यांनी सांगितले. याबाबत सिव्हिल पोलिस चौकीत नोंद करण्यात आली आहे.
.

Share this story