*बोधेगाव पोस्ट ऑफिसच्या नूतन इमारतीचा शुभारंभ*
*बोधेगाव पोस्ट ऑफिसच्या नूतन इमारतीचा शुभारंभ*

 

बोधेगाव दि 8 जून टीमसीएम न्यूज

माहिती तंत्रज्ञान युगात डिजिटल सुविधा निर्माण झाल्या असून पोस्ट विभागाच्या विविध कल्याणकारी योजनेचा जनतेनी जास्तीत जास्त फायदा घ्यावा असे प्रतिपादन पोष्ट विभागाचे उपविभागीय अधिकारी धनेश यादव यांनी व्यक्त केले.
शेवगाव तालुक्यातील बोधेगाव पोस्ट ऑफिस च्या स्थलांतरित नवीन इमारतीचा शुभारंभ आज बोधेगाव चे सरपंच सुभाष पवळे, बोधेगाव व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर काका हुंडेकरी, शेवगाव पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक विश्वास पावरा,पोष्ट विभागाचे उपविभागीय अधिकारी धनेश यादव, सबपोस्ट मास्तर .रामेश्वर ढाकणे मयूर हुंडेकरी, भगवान बाबा मल्टीस्टेट चेअरमन.मयूर वैद्य, सेंट्रल बँकेचे मॅनेजर दिगंबर कदरे .शिवाजी आण्णा मासाळकर, पत्रकार बाळासाहेब खेडकर,रामेश्वर तांबे, यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या बोधेगाव पोस्ट ऑफिसचा नूतन इमारतीचा प्रश्न अखेर तो मार्गी लागला, जुनी इमारत अत्यंत धोकादायक अवस्थेत होती. त्यामुळे बोधेगाव पोस्ट ऑफिसची इमारत तातडीने बदलण्यासाठी ग्रामस्थांमधून अनेक वर्षांपासून वरिष्ठांकडे जोरदार मागणी होती. अखेर हा प्रश्न आज मार्गी लागला आहे नवीन कार्यलय शेवगाव-गेवराई रोड लगत बीएसएनएल टॉवर लगत असलेल्या सुसज्ज अशा जागेमध्ये स्थलांतरण करण्यात आले.
यावेळी बोलताना प्रभाकर काका हुंडेकरी म्हणाले की, नवीन इमारत ही अतिशय सुसज्ज व सर्व सोयींनी युक्त असल्याने त्याचा जनतेला फायदा होणार असल्याचे सांगून ग्रामस्थांच्या वतीने कौतुक करण्यात आले.
यावेळी सबपोस्ट मास्तर रामेश्वर ढाकणे पोष्ट खातेने जनतेचा विश्वास संपादन केला आहे पोस्ट ऑफिसच्या विविध योजनांची माहिती देऊन जास्तीत जास्त ग्रामस्थांनी पोस्ट ऑफिसच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. बोधेगाव पोस्ट ऑफिस ची इमारत बदलण्यासाठी अहमदनगर विभागाचे वरिष्ठ डाक अधीक्षक. जे टी भोसले यांच्या मार्गदर्शनाने तसेच उपडाक अधीक्षक संदीप हदगल यांच्या सहकार्याने हे शक्य झाले असल्याने ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले.

Share this story