नरभक्षक बिबट्या आष्टीतून थेट करमाळा तालुक्यात दाखल;फुंदेवाडीत हल्ल्यात एक ठार
नरभक्षक बिबट्या आष्टीतून थेट करमाळा तालुक्यात दाखल;फुंदेवाडीत हल्ल्यात एक ठार

बिबट्या आष्टीतून थेट करमाळा तालुक्यात दाखल;फुंदेवाडीत हल्ल्यात एक ठार

आष्टी दि 4 डिसेंबर, प्रतिनिधी

नरभक्षक बिबट्याने आष्टी तालुका सोडला असल्याची बातमी यापूर्वी सीएम न्यूज ने 1 डिसेंबर रोजी दिली होती.त्यानंतर दि 3 डिसेंबर रोजी बिबट्याने करमाळा तालुक्यातील फुंदे वाडी येथे शेतात काम करणाऱ्या व्यक्तीवर हल्ला करून ठार केल्याची घटना घडली आहे.
आष्टी तालुक्यात बिबट्याने तीन व्यक्तीवर हल्ला करून ठार केले होते.आष्टी तालुक्यातील शेवटचा हल्ला त्याने पारगाव येथे 29 नोव्हेंबर रोजी केला होता .त्यानंतर दुसऱ्या दिवशी हा बिबट्या पारगाव मध्ये दिसला होता तसेच त्याचे पग मार्क ही आढळून आले होते.त्यानंतर त्याने हा भाग सोडला.

बिबट्या पिंजऱ्यात न आल्याने तो पुन्हा मनुष्यावर हल्ला करणार असल्याचे लक्षणे त्याच्या आतापर्यंतच्या हल्ल्यातून सिद्ध झाले आहे. बिबट्याच्या मोडस ऑपरेंडी नुसार हा बिबट्या जागा सोडल्यानंतर 15 ते 16 किमी प्रवास करतो .सध्या हा बिबट्या डिस्टर्ब झाल्याने तो मनुष्यावर हल्ला करत आहे.

बिबट्याने केला असा प्रवास

वन विभागाच्या महितीनुसार या बिबट्याने जालना जिल्ह्यात महिला ठार केल्यानंतर पैठण तालुक्यातील अपेगाव येथे पितापुत्राला ठार केले होते .त्यानंतर त्याने हा भाग सोडला तो पाथर्डी तालुक्यातील भगवानगड तांड्यावर एका महिलेवर हल्ला केला .तेथून  शिरूर तालुक्यातील जटवड येथे हल्ला करून आष्टी तालुक्यातील सुरुडी येथे आला .तिथे त्याने नागनाथ गर्जे यांच्या वर हल्ला केल्यानंतर तो कींन्ही येथे आला त्याने स्वराज वर हल्ला केला त्यानंतर नगर जामखेड हायवे ओलांडून त्याने मंगरूळ मध्ये प्रवेश केला.मंगरूळ मध्ये ऐका महिलेवर हल्ला केल्यानंतर तो पारगाव मध्ये गेला तिथे दोन हल्ले केले .त्यामध्ये एक यशस्वी झाला त्यामध्ये सुरेखा बळे यांचा मृत्यू झाला .

पारगाव मध्ये सर्व बाजूनी नागरिकांनी गस्त घातल्याने त्याने हा भाग सोडला .यासंदर्भात सी एम न्यूज ने 1 डिसेंबर रोजी ही बातमी दिली होती .ती तंतोतंत खरी झाली आहे.
दि 3 रोजी या बिबट्याने फुंदेवाडी येथे एका शेतकऱ्यावर हल्ला केला त्यात त्याचा मृत्यू झाला .
हेही वाचा:*’त्या’बिबट्याला ठार मारण्याचा प्रस्ताव विभागीय अधिकार्‍याकडे दाखल;आ.आजबे यांची सूचना*

Share this story