करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ
करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ

परळी /अनुप कुसुमकर 


  सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बेछूट आरोप करीत असताना परळीतील काही महिलांनी मज्जाव केला असता  करुणा शर्मा व त्यांचा साथीदार यांनी जीवे मारण्याची व जातीवाचक शिवीगाळ केल्या प्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून या प्रकरणी करुणा शर्मा व त्यांचा साथीदार यांना परळी शहर पोलिसांनी अटक केली.

    सोमवार दि 6 रोजी या दोघांनाही न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.परळीत हे दोघे आले असता त्यांच्या गाडीत पोलिसांना पिस्तुल आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.


      परळी शहर पोलिसांकडून प्राप्त माहिती अशी की,फिर्यादी विशाखा रविकांत घाडगे रा.शिवाजी नगर ह्या आपल्या मैत्रिणी सोबत शहरातील वैद्यनाथ मंदिर येथे दर्शनास आले असता या ठिकाणी करूणा शर्मा व त्याचा सहकारी अरुण दत्ता मोरे हे दोघे जण राज्याचे सामाजिक न्याय मंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या बाबतीत जोरजोरात अपशब्द वापरून बोलत असताना विशाखा घाडगे यांनी या दोघांना ही हा मंदिर परिसर आहे याठिकाणी अपशब्द वापरू नका अशी विन्नती केली असता करूणा शर्मा व अरुण मोरे यांनी विशाखा घाडगे व सोबत असलेल्या महिलांना जातीवाचक शिवीगाळ करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.या प्रकरणी विशाखा घाडगे यांच्या फिर्यादीवरून करुणा शर्मा व अरुण मोरे यांच्या विरोधात कलम 307,323,504,506 34,3(1), ( R ),3(1),3(2) भांदवि व अनुसूचित जाती,जमाती कायद्यांवे गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही आरोपींना परळी शहर पोलिसांनी अटक केली आहे.


सोमवार दि 6 रोजी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

दरम्यान करुणा शर्मा यांनी यापूर्वी अनेक वेळा सोशल मीडियावर सामाजिक न्याय मंत्री ना.धनंजय मुंडे यांची बदनामी केलेली आहे यामुळे करुणा शर्माच्या गाडीत पिस्तुल आढळल्याने त्यांच्या धनंजय मुंडे व त्यांच्या कुटुंबीयांचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.


करुणा पासून माझ्या जीविताला धोका - मुंडेंनी याआधीच केले होते स्पष्ट

नेहमी धनंजय मुंडेंना उध्वस्त करणार, संपावणार यासारख्या भाषा करणाऱ्या करुणा शर्मा यांच्यापासून आपल्या जीवाला धोका असल्याचे धनंजय मुंडे यांनी उच्च न्यायालयात तसेच फेसबुक वरील आपल्या खुलाशात देखील म्हटले होते. 
 तेव्हा  बाळगलेले पिस्तुल घेऊन करुणा शर्मा ना.मुंडेंच्या घरी कोणत्या उद्देशाने जाणार होत्या, या सवालाने परळीत एकच खळबळ उडाली आहे.

 

Share this story