परळी प्रकरणात करुणा शर्मा यांनी 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी
करुणा शर्मा

परळी वै: दि 06 अनुप कुसूमकर

       जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यात करुणा शर्मा  यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल आहे. या प्रकरणी त्यांना  अंबाजोगाई जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. 
   करुणा शर्मा यांना न्यायालयाने  14 दिवसांची  न्यायालयीन कोठडी  तर या प्रकरणातील अन्य एक आरोपी असलेल्या अरुण मोरे यांस एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
      दरम्यान न्यायालयामध्ये वकील पोहोचू न शकल्याने करुणा शर्मा यांनी स्वतः आपली बाजू न्यायालयासमोर मांडली.


आणखी वाचा : पोळा pongal विशेष ; बैलांचा  देव आहे तरी कुठे?

        राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या बाबतीत बेछुट आरोप करुन परळीत पत्रकार परिषद घेऊन सत्य जगासमोर आणण्याचा दावा करून रविवार दि. ५ रोजी परळी मध्ये दाखल झालेल्या करुणा शर्मा यांची काही महिलांसोबत बाचाबाची झाली. 
      त्यानंतर जातीवाचक शिवीगाळ व धक्काबुक्की केल्याच्या आरोपावरून करुणा शर्मा यांच्यावर 307,323,504,506 34,3(1)(,R),3(1),3(2) भादवि व अनुसुचित जाती,जमाती जातीवाचक शिवीगाळ करणे,जीवे मारणे आदी गुन्हानुसार कायद्याणव्ये परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ जीवे मारण्यासह ऑट्रासिटीनुसार शहर पोलिसात गुन्हा


        त्याप्रमाणे करुणा शर्मा यांच्या गाडीची झडती घेतली असता एक पिस्तूल आढळून आला होता. या पार्श्वभूमीवर त्यांना सोमवार (दि. ६) अंबाजोगाई येथील जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी मंजूर केली. 
           या प्रकरणातील दुसरा आरोपी असलेल्या अरुण मोरे यास न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान न्यायालय कामकाजात सरकारी अभियोक्ता अशोक कुलकर्णी यांनी काम पाहिले तर करुणा शर्मा यांचे वकील न्यायालयात वेळेवर पोहोचू न शकल्याने करुणा शर्मा यांनी स्वतःच न्यायालयासमोर आपली बाजू मांडली.


 

Share this story