नारायण राणेंना अटक पण प्रकृती बिघडली; बीपी, साखरेचे प्रमाण वाढले
नारायण राणे अटक

नारायण राणेंना अटक पण प्रकृती बिघडली; बीपी, साखरेचे प्रमाण वाढले

रत्नागिरी - केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे महाराष्ट्रभर वादंग माजले आहे. संपूर्ण राज्यात राणे तसेच भाजपविरोधात शिवसेनेसोबतच राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे कार्यकर्त आक्रमक झाले आहे. या वक्तव्यामुळे राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला असून त्यांना अटक करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर राणे यांच्या प्रकृतीबाबतीत एक मोठी माहिती समोर आली आहे. राणे यांची प्रकृती बिघडली असून त्यांना बीपी आणि शुगरचा त्रस जाणवत असल्याची माहिती भाजप नेते प्रमोद जठार यांनी दिली आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना संगमेश्वर पोलीस स्थानकात आणले
रत्नागिरी -  पोलिसांनी नारायण राणे यांना ताब्यात घेऊन संगमेश्वर पोलीस स्थानकात आणण्यात आले आहे. या ठिकाणी त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात येत असल्याची माहिती मिळत आहे.


यात्रा थांबली आता आंदोलनाला सुरुवात : प्रमोद जठार

संगमेश्वर - संभाजी महाराजांना देखील संगमेश्वर मध्ये अटक केली. त्याच संगमेश्वर मध्ये राणे साहेबांना अटक केली. जोपर्यंत राणे साहेबांना सोडले जात नाही तोपर्यंत कोकण शांत होणार नाही. आता यात्रा थांबली आहे, आता आंदोलनाला सुरुवात झाली आहे. ज्यावेळी राणेसाहेबांची सुटका होईल त्यावेळी आमची यात्रा पुन्हा सुरू होईल, असे वक्तव्य प्रमोद जठार यांनी केले आहे.

Share this story