Narcotics Control Bureau (NCB) महिलेची छेड काढल्याप्रकरणी मुंबई नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचा मोठा अधिकारी अटकेत
Narcotics Control Bureau (NCB)

 परळी,प्रतिनिधी 

Narcotics Control Bureau (NCB) एका महिलेची   छेड काढल्याप्रकरणी मुंबई नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो चे अधीक्षक दिनेश चव्हाण यांना रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे.


ही घटना परळी रेल्वे पोलीस हद्दीतील लातूर रोड स्टेशनच्या परिसरात घडली.

यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार रेल्वे पोलिसांनी दिनेश चव्हाण यांना परळी येथे अटक केली.

हैदराबाद हडपसर रेल्वे गाडीमध्ये हा प्रकार घडले असल्याची माहिती पुढे आली आहे.

रेल्वे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार रात्री उशिरा उदगीर ते लातूर रोड दरम्यान नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो चे अधीक्षक दिनेश चव्हाण यांनी एका महिलेची  छेड काढली.

त्यानंतर या महिलेने  रेल्वे पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार रेल्वे पोलिसांनी दिनेश चव्हाण यांना अटक केली.

त्यांच्यावर भा द वि 354, 509  अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्यांना औरंगाबाद येथील न्यायालयात नेण्यात आले असल्याची माहिती रेल्वे  पोलिसांनी दिली.

Share this story