उस्मानाबादचे उमेश खोसे आणि गडचिरोलीचे खुर्शीद शेख यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर
राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार

अहमदनगर 

केंद्रीय शिक्षण मंत्रालयातर्फे देण्यात देण्यात येणाऱ्या राष्ट्रीय शिक्षक  पुरस्कार जाहीर झाले.राज्यातील उस्मानाबाद आणि गडचिरोली जिल्ह्यातील दोन शिक्षकांना हे पुरस्कार जाहीर झाले असून 5 सप्टेंबर रोजी प्रदान केले जाणार आहेत.

उस्मानाबाद जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जगदंबा नगर उमरगा तंत्रस्नेही शिक्षक उमेश खोसे आणि गडचिरोली जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा असराल्ली तालुका सिंरोंचा येथील खुर्शीद कुतुबुद्दीन शेख यांचा समावेश आहे.आज केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने या संदर्भातील आदेश जारी केला आहे.
देशातील 44 शिक्षकांना हा पुरस्कार जाहीर झाला असून त्यामध्ये राज्यातील दोन शिक्षकांनाचा समावेश आहे.

Share this story