navratri 2021,नवरात्री उत्सवासाठी देवींची सर्व मंदिरे सज्ज!
navratri 2021,नवरात्री उत्सवासाठी देवींची सर्व मंदिरे सज्ज!

 
navratri 2021, राज्य सरकारने ७ ऑक्टोबर पासून मंदिरे उघडण्यास परवानगी दिली आहे. विविध धार्मिक ठिकाणचे मंदिर प्रशासन सज्ज झाले आहेत.या पार्श्वभूमीवर मात्र कोरोना असलेल्या ठिकाणी यात्रा जत्रा भरविण्यास मनाई केली आहे. यासंदर्भातील आदेश अहमदनगरचे जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांनी आदेश काढले आहेत. तर ज्या ठिकाणी कोरोना रुग्ण कमी आहेत अशा ठिकाणी मंदिर प्रशासनाने काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केली आहे. 

navratri 2021, अहमदनगर जिल्ह्यात या काळात यात्रा /जत्रा भरविण्यास मनाई करण्यात आली आहे. तर मंदिर व्यवस्थापनाश दररोज फक्त 5 हजार भविनानांना प्रवेश देता येईल तेही ऑनलाइन पद्धतीने असे आदेश प्रशासनाने काढले आहेत.  त्याच बरोबर 65 वर्षावरील नागरिक आणि 10 वर्षाच्या आत असलेल्या बालकांना मंदिरात प्रवेशास बंदी असणार असल्याचे जाहीर केले आहे. 

navratri 2021,नवरात्र काळात मंदिरात हे असणार बंधन 

मंदिरात भाविकांनी मूर्तींना स्पर्श करण्यास बंदी घालण्यात आली आहे .  या ठिकाणी कोणतेही सामुहिक गायनास बंदी घालण्यात आली आहे. त्यासाठी मंदिर प्रशासनाने रेकोर्ड प्ले वर भर द्यावा असेही आवाहन करण्यात आले आहे.
मंदिराच्या आजूबाजूला असलेल्या दुकानांना सामाजिक अंतर ठेवणे बंधनकारक करण्यात आल्या आहेत.तसेच या दुकानांमध्ये भाविकांनी  सामाजिक अंतर ठेवणे महत्वाचे आहे.  
मंदिर प्रवेशापूर्वी भाविकांनी  हात धुवून प्रवेश करावा. अशा प्रकारच्या सूचना  जिल्ह्यातील जगदंबा देवी मोहटे, जगदंबा देवी राशीन, रेणुका माता देवी मंदिर केडगाव, रेणुका माता मंदिर, एमआयडीसी, रेणुका माता भिस्तबाग , तुळजा भवानी बुऱ्हाणनगर यांना देण्यात आल्या आहेत.

परळीत धनंजय मुंडेंच्या उपस्थितीत उघडणार प्रभू वैद्यनाथाची दारे


12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले वैद्यनाथ मंदिर उद्या पहाटे 5 वाजल्यापासून भाविकांसाठी खुले होणार आहे. राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री ना. धनंजय मुंडे यांनी या निर्णयाचे स्वागत केले असून, ना. मुंडे हे पहाटे 5 वाजता वैद्यनाथ मंदिरात दर्शनासाठी उपस्थित राहून होणाऱ्या विशेष पूजेस उपस्थित राहणार आहेत. 

Share this story