*स्व.मुंडे स्मृतिदिन*पंकजाताईचे भावनिक आवाहन;घरात रहा दिवे लावा*
*स्व.मुंडे स्मृतिदिन*पंकजाताईचे भावनिक आवाहन;घरात रहा दिवे लावा*

मनोज सातपुते

३ जून म्हटल कि स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांची आठवण येते. स्वर्गीय मुंडे यांचे या दिवशी निधन झाले होते  हा दिवस मुंडे यांचा स्मृति दिन म्हणून साजरा केला  जातो. परळी जवळील गोपीनाथगडावर मुंडे यांचा स्मृतिदिन संघर्ष दिन म्हणून साजरा केला जातो. किंबहुना स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्यावर प्रेम करणारे मुंडेभक्त येथे दरवर्षी येत असतात. यंदा मात्र या स्मृतिदिनाला नागरिकांनी घरातच बसून स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमेला हार घालून दोन्ही बाजूने दिवे लावण्याचे आवाहन माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी केले आहे.यंदा हे सहावे वर्ष आहे.

 गोपीनाथ गडावर संघर्ष दिनाच्या निमित्ताने मोठा जनसागर उसळत असतो. यंदा कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी गर्दी करू नये यासाठी पंकजा मुंडे यांनी आपल्या ट्वीटर संदेशाद्वारे आवाहन केले आहे. या संदेशात मुंडे यांनी  सांगितले कि,

“गोपीनाथ गड माणसांनी तुडुंब भरलेला असतो, ढोक महाराजांचं किर्तन असतं, मग प्रमुख कार्यक्रम आणि प्रसाद असा दरवर्षीचा नियम असतो.. पण यावेळी संघर्ष वेगळा आहे, सर्वांनी कोरोना मुळे काळजी व लॉकडाउनच्या नियमाचं पालन करायचे आहे, ही माझी विनंती आहे. यावर्षी कोणीही गर्दी करायची नाही दर्शनासाठी नाही आणि मला भेटण्यासाठी देखील नाही…

गडाचा कार्यक्रम साधा व मोजक्या लोकांत असेल, तो Live दाखवता येईल.

तुम्ही सर्वांनी कुटुंबा समवेत मुंडे साहेबांच्या फोटो समोर उजव्या बाजूला घरातील महिला

आणि डाव्या बाजूला पुरुष उभे राहुन दोन दिवे/ समई लावायचे आहेत… आजी, सुन, नात उजवीकडे, तर आजोबा, मुलगा, नातू डावीकडे असं उभं राहून दिवा लावायचा आहे.. साहेबांचा आवडता पदार्थ बनवयाचा, तो काय मी तुम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही.. हे दोन दिवे लावण्यास मी सांगितले ते स्त्री आणि पुरुष

समानतेचा संदेश देणारे आणि समानता जगणारे म्हणून लावायचे.. कोणतही एक समाज कार्य करायचं, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मदत,

अन्नदान, रक्तदान, मास्क किंवा औषधांचे वाटप इत्यादी.. सर्व कुटुंबीयांनी आणि हे सर्व करतानाचे फोटो माझ्या फेसबुक, ट्विटर,
.!इन्स्टाग्रामवर पाठवायचे आहेत…दुपारी १२ ते सायं. ०६ मध्ये आपण हे कार्य करून कृपया शेअर करावे..

पंकजा मुंडे यांच्या या आवाहनामुळे यंदा स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचा स्मृतिदिन साधे पणाने आणि गर्दी न होता साजरा होणार असल्याचे दिसत आहे.

Share this story