परळी- अंबाजोगाई महामार्ग वाहतुकीसाठी बंद
परळी-अंबाजोगाई

परळी / अनुप कुसुमकर 

जिल्ह्यात झालेल्या पावसाने रस्त्यांची वाताहत झाली आहे. परळी- अंबाजोगाई महामार्गाचे काम सुरु असून  वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असल्याची माहिती परळी ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मारोती मुंडे यांनी सांगितले.


राष्ट्रीय महामार्गाच्या कामानिमित्त परळी-अंबाजोगाई मार्गावरील कण्हेरवाडी शिवारात उभारण्यात येत असलेल्या पुलाजवळील वळण रस्ता व तात्पुरता पुलावरून पाणी वाहत असल्याने परळी-अंबाजोगाई मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.

आणखी वाचा :करुणा शर्मा यांच्या कडून परळी पोलिसात गुन्हा दाखल


कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरीता ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मारोती मुंडे व त्यांचे सहकारी भर पावसात घडनास्थळी परिस्थिती हाताळत आहेत.
बीड जिल्ह्यात पावसामुळे छोट्या नद्या नाले यांना पूर आल्याने  अनेक गावांचा तुटला आहे. तर पूले पाण्याखाली गेले आहेत. 

 

Share this story