ग्रामीण भागात शेतकऱ्यांकडून बैलपोळा उत्साहात साजरा
पोळा

परळी /अनुप कुसूमकर

शेतकऱ्यांचा खरा सोबती,प्रत्येक सुखा-दुःखात साथ देणारा,शेतातील अन्न-धान्य पिकविण्यासाठी राब-राब राबणाऱ्या बैलाप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी श्रावणात पिठोरी अमावस्येला सर्जा- राजाचा सण हा बैलपोळा म्हणून साजरा केला जातो.

     परळी तालुक्यातील ग्रामीण भागात पोळा सणाचा लगबग पहावयास मिळाली.मागील वर्षी कोरोनाची परिस्थिती भयावह असल्याने एक ही सण साजरा करता आला नव्हता मात्र या वर्षी कोरोना परिस्थिती नियंत्रणात असल्याने शेतकऱ्यांनी बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी व त्यांच्या कष्टाचे आभार मानण्यासाठी हा दिवस मोठ्या आनंदाने व उत्सहाने साजरा केला.

या सणाला शेतकरी व त्यांच्या एकूणच परिवारासाठी अंत्यत उत्साह दिसून येत होता.

आणखी वाचा : परळी प्रकरणात करुणा शर्मा यांनी 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी

बैलपोळ्या दिवशी बैलाची पूजा करून गावभर त्याची वाजतगाजत मिरवणूक काढली जाते. गावात मिरवणूक झाल्यानंतर घरी महिला बैलांची पूजा करतात.

  काही ठिकाणी मातीच्या बैलांची पूजा करून पूजा करतात. या दिवशी गोड-धोड नैवेद्य बैलांना खाण्यासाठी ठोंबरा, पुरणपोळी, कढी, भजे यासारखे वेगवेगळे पदार्थ बनवतात.

बैलपोळा सण श्रावण महिन्यात पिठोरी अमावस्येच्या दिवशी साजरा करतात. आदल्या दिवशी खांदेमळणी केली झाले. पोळ्याच्या दिवशी सकाळी बैलांना आंघोळ घालून त्यांना सजवलं जातं. झुल चढवली जाते. गळ्यात चंगाळी, शिंगाना रंगवलं जातं.


 

Share this story